Fireman Vishal Jadhav should give the status of a martyr
Fireman Vishal Jadhav should give the status of a martyr 
पुणे

Video : फायरमन विशाल जाधव यांना शहीदाचा दर्जा हवाच

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : फुगेवाडी येथील दुर्घटनेमध्ये प्राणांची बाजी लावून स्वतःचे कर्तव्य बजावित असताना मृत्यूमुखी पडलेले फायरमन विशाल जाधव यांना शहीदाचा दर्जा मिळायलाच पाहिजे,'' अशी आग्रही मागणी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच एखाद्या दुर्घटनेची वर्दी मिळाल्यावर तत्काळ पोलीस बंदोबस्त मिळायला हवा,'' असेही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. 

फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दला अस्तित्वात आल्यापासून आजतागायत असंख्य किरकोळ अपघात झाले. परंतु, फुगेवाडी येथील दुर्घटनेत कर्तव्य बजावित असताना फायरमन विशाल हणमंतराव जाधव यांनी आत्म बलिदान दिले. या दलाच्या इतिहासात प्रथमच हा प्रकार घडला. त्या पार्श्‍वभूमीवर, अग्निशामक सर्व कर्मचाऱ्यांनी वरील आग्रही मागणी केली. 


फायरमन अनिल डिंबळे म्हणाले,"संरक्षण दलांशी आम्ही स्वतःची तुलना करत नाही. परंतु, अग्निशामक दलाच्या जवानांनाही कर्तव्य बजावत असताना जीवाचा धोका असतोच. काम करताना काहीही घडू शकते. त्यामुळे, एखाद्या दुर्घटनेत जवानाचा मृत्यू झाल्यास त्याला शहीदाचा दर्जा मिळावा, अशी आमची पूर्वीपासूनच सातत्याने मागणी राहिली आहे. यापूर्वी मुंबई, कल्याण-डोंबिवली येथील दुर्घटनांमध्ये अग्निशामक दलाच्या जवानांनी आत्मबलिदान दिले. त्यांना शहीदाचा दर्जा मिळाला आहे. जाधव यांनी देखील कर्तव्य बजावित असताना स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे, त्यांनाही तो दर्जा मिळायलाच पाहिजे.'' 

स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे, तर सभागृह नेतेपदाची माळ घाटेंच्या गळ्यात 

फायरमन चंद्रशेखर घुले म्हणाले,"जाधव यांना शहीदाचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही सर्व आग्रही आहोत. आमचे केंद्र 1971 पासून सुरु झाले. तेव्हापासून कोणत्याही कर्मचाऱ्यावर प्राणांचीच आहुती देण्याचा प्रसंग आला नव्हता. त्यांचा मृतदेह अग्निशामक दलाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून आम्ही मानवंदना दिली. पालिकेचे पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, त्यांच्यावर अधिकृतपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले पाहिजे होते.'' 

पबजीमुळे पुण्यात 16 वर्षाच्या मुलाची आत्महत्या

वेळेवर पोलीस बंदोबस्त मिळत नाही... 
"कोणत्याही दुर्घटनेच्यावेळेस आम्हाला पोलीस बंदोबस्त वेळेवर मिळत नाही. फुगेवाडी येथील दुर्घटना त्याचाच एक भाग होती. सेल्फी आणि फोटोच्या नादात बघ्यांच्या गर्दीला दुर्घटनेचे गांभीर्य राहत नाही. त्यामुळेच समस्या आणखी जटील होत जाते. त्यामुळे, वर्दी मिळाल्यावर तत्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन दिला गेला पाहिजे'', असेही अग्निशामक कर्मचारी यांनी सांगितले.

Video:पबजी खेळून डोकं फिरलं, घटनेपेक्षा तरुणाचं नाव जास्त चर्चेत!  

"प्रामाणिकपणे कर्तव्य बजावताना अग्निशामक दलाचे जवान प्राणांचीही बाजी लावत असतात. फुगेवाडी दुर्घटनेत देखील जाधव हे मानवतेच्या रक्षणासाठी स्वतःचे कर्तव्य बजावत होते. त्यामुळे, जाधव यांना निश्‍चितपणे शहीद ही ओळख मिळायला हवी.''
- किरण गावडे, मुख्य अग्निशामन अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका 

पुणे : मार्केटयार्डात राजस्थानी गाजराचा हंगाम सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT