corona update sakal
पुणे

पुणे : १९ मे नंतर प्रथमच ओलांडला एक हजार रुग्णांचा टप्पा

पुण्यात ८० रुग्ण एका दिवसात सापडले

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : अवघ्या सात दिवसात दिवसांपूर्वी पुण्यात ८० रुग्ण एका दिवसात सापडले होते. मात्र, त्यानंतर अचानक रूग्णसंख्या वाढण्यास सुरवात झाली असून, आज शहरात १ हजार १०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १९ मे २०२१ नंतर प्रथमच शहरात एका दिवसात एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.(Pune Corona Update)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये शहरात ८ एप्रिल रोजी एका दिवसात तब्बल ७ हजार १० जणांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. ६ डिसेंबर २०२१ रोजी शहरात केवळ ३८ रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर एक महिन्याने हीच संख्या १हजार १०४ पर्यंत वर गेली आहे.(Pune News)

कोरोनाच्या ओमिक्रॅन (Omicron) विषाणूचा धोका वाढत चालल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन शासनातर्फे केले जात होते. पण तरिही गर्दीवर नियंत्रण राहत नसल्याने गेल्या आठवड्यात लग्न समारंभ, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांवर उपस्थितीचे बंधन आणले. त्यानंतर आता शहरातील इयत्ता १ली ते ८वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात २७ डिसेंबर रोजी शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९९० इतकी होती, पण आता रुग्णसंख्या वाढत चालल्याने आज ४ जानेवारी रोजी २ हजार ८३८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचा दर हा तब्बल १८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. सध्या असलेले नियम आणखी कडक केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : जमीन व्यवहारात माझा संंबंध नाही, प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलंय- मुरलीधर मोहोळ

IND vs AUS 1st ODI Live: १० मिनिटांच्या पावासनं १ षटक कमी झालं... आता तर एक तास झाला पाऊस पडतोय; जाणून घ्या किती षटकांची मॅच होणार

Diwali 2025: दिवाळीत दमा अन् सीओपीडीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा एका क्लिकवर

Parental Welfare Law : आई-वडिलांना वाईट वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, पगारही कापला जाणार अन्...

भाजप ZP, पंचायत समितीसाठी उमेदवार कसे शोधणार? स्ट्रॅटेजी ठरली, ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT