d.jpg 
पुणे

पुणे जिल्ह्यातील 'या' पाच गावांचे पुर्नवसन

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव  : आंबेगाव तालुक्यातील माळीण गावच्या धर्तीवरील दरडप्रवण (धोकादायक) पाच गांवाच्या पुनर्वसनाचे प्रस्ताव तातडीने तयार करून गावांचे जलद गतीने पुनर्वसन करण्याच्या सुचना कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. 

तसेच यावर तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी प्रांत अधिकारी व पंचायत समिती यांना दिले आहेत. या संदर्भात पंचायत समितीच्या सभागृहात अधिकारी व ग्रामस्थांसह बैठक घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे ठरले.

दरडप्रवण गावांमध्ये खराळे तुटणे, भेगा पडणे, जमीन खचणे, दगडी कोळसणे, घरांना पाझर येणे असे प्रकार घडतात. आंबेगाव तालुक्यात माळीण (पसारवाडीतील २५ घरे), मेघोली येथील १५ घरे, जाभोरी (काळवाडी न. १) मधील ३५ घरे तर काळवाडी न.२ मधील २९ घरे ,फुलवडे (भगतवाडीतील १४ घरे), पोखरी (बेंढारवाडीतील ५७ घरे) व येथील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर,पाण्याच्या टाक्यासह या कुंटुबांचे पुनर्वसन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पंचायत समिती सभागृहात बैठक आयोजित केली होती. यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे पाच गावांतील जागा मालक, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. या गावची अनेक वेळा पाहणी करण्यात आली होती.

माळीणच्या धर्तीवर तालुक्यातील ५ दरडप्रवन गावांच्या पुनर्वसन तातडीने करण्यासाठी माळीण येथील घरांच्या लोकार्पन सोहळ्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० कोटीची तरतुदीस मंजुर केल्याचे आश्वासन दिले होते यानंतर अद्यप काही झाले नाही. फक्त पावसाळा सुरू झाल्यावरच यावर चर्चा व प्रशासन धावपळ करते. मात्र पुढे काहीच होत नाही.

मागील दोन वर्षांपासून मेघोली येथील व जाभोरी (काळवाडी न. १ तर काळवाडी न.२ मधील कुटुंबांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागते. या वर्षीही पावसाळ्यात असेच करावे लागणार आहे. या गावांचा प्रस्थाव युध्दपातळीवर मंजुर करुन दिवाळीपर्यंत घरांची कामे सुरू करणाचा प्रयत्न मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून सुरु असल्याचे सभापती संजय गवारी यांनी यावेळी बैठकीत सांगितले आहे.

दरम्यान, यात पुनर्वनासाठी आवश्यक त्या कागद पत्राची पूर्तता करुन सदरचे प्रस्ताव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. सदरच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी संबधित गावातील नागरीकांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT