Food donation will continue even after lockdown Increase.jpg 
पुणे

Corona Virus : लाॅकडाऊन वाढले तरी, अन्नदान सुरूच राहणार; विद्यार्थी, निर्वासितांना दिलासा

सकाळवृत्तसेवा

पुणे: 'लाॅकडाऊन' एप्रिल अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असली तरी शहरात अडकून पडलेल्या हजारो विद्यार्थी व निर्वासितांची उपासमार होऊ नये यासाठी संस्था, संघटनांनी कंबर कसली आहे. बाजारपेठ बंद असली तरी धान्य, भाजीपाला यासह वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकही जण उपाशी रहाणार नाही यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असा विश्वास संस्थांच्या प्रतिनिधींनी दिला. 


बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
'कोरोना'ला रोखण्यासाठी लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्यासाठी थांबलेल्या विद्यार्थ्यांची उपासमार सुरू झाली. अशीच अवस्था हाॅटेल, बांधकाम साईट, केटरिंग यासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची झाली. त्यांना तर रहायला घर व खायला अन्न नसल्याने त्यांचे झाल झाले. 
...म्हणून येताहेत शिवभोजन मिळविण्यात अडचणी
या विद्यार्थी व निराधार कामगारांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, संघटना समोर आल्या आहेत. निराधारांसाठी मनपा शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. 
सर्व पेठा, सिंहगड रोड, कोथरूड, कर्वेनगर यासह इतर भागातील १ हजार विद्यार्थ्यांना रोज दोन वेळेचे डबे घरपोच दिले जात आहेत. तर, पालिका शाळांमध्ये रहाणार्या कामगारांनाही नाष्टा व दोन वेळेचे जेवण दिले जात आहे. 

रात्रीचा दिवस करीत ते देताहेत अत्यावश्‍यक सेवा
या संस्था, संघटनांनी १४ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन रहाणार  असल्याने तो पर्यंत जेवण पुरविण्याची जबाबदारी घेत मालाचा साठा व पैशाचे नियोजन केले होते. मात्र आता आणखी १५ दिवस लाॅकडाऊन वाजल्याने रोज १ हजार पेक्षा जास्त जणांच्या जेवणाची सोय करण्याचे आव्हान आहे. 

Lockdown : भाडे नाही तर, घर सोडा: मालकांच्या तंबीला विद्यार्थी वैतागले 
म्हणाले, "सीओईचीच्या मदतीने रोज २ हजार १०० जणांना अन्न पुरविले जात आहे. तर रोज जीवनावश्यक वस्तूंच्या किमान ३०० कीट वाटप केल्या जात आहेत.१४ एप्रिल पर्यंतचे नियोजन आम्ही केले होते. मात्र त्यानंतरही गरजवंतांना जेवण देता यावे यासाठी तयारी सुरू आहे. 

लॉकडाऊनमध्येही सोन्याचे भाव चढेच, साडेतीन हजार रुपयांची वाढ
गिरीजा हाॅटेलमधून मनपा शाळेत रहाणार्या निराधारांना दोन वेळा जेवण मनपाच्या माध्यमातून दिले जात आहे. याबाबत उदय जोशी म्हणाले, जो पर्यंत महापालिका सांगेल तो पर्यंत आम्ही अन्नदान करू. सध्या १० दिवसांचे धान्य शिल्लक आहे. पुढचे नियोजन सुरू आहे. लाॅकडाऊन कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत आहोत. 

बारामतीच्या जिरायती भागात शिरसाईचे आवर्तन सुटले​
विद्यार्थ्यांनी चिंता करू नये
सृजन फाऊंडेशन व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जेवण दिले जात आहे. लाॅकडाऊन वाढल्याने जेवणाचे हाल सुरू होतील अशी त्यांना भिती आहे. याबाबत किरण निंभोरे म्हणाले, "१४ एप्रिल नंतर विद्यार्थ्यांना जेवण देण्यासाठी धान्य व इतर वस्तूंचा साठा करत आहोत. भाज्यांची प्रचंड दरवाढ झाल्याने आमचा खर्च वाढत आहे. पण तरीही विद्यार्थ्यांना चांगले जेवण दिता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी मदत करण्यासाठी ८४८४०८६०६१ या क्रमांकावर संपर्क साधावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT