Former Union Minister Arun Shourie admitted to hospital due to head injury.jpg 
पुणे

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली इजा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : माजी केंद्रीय मंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी हे लवासा येथील घराच्या अंगणात पडल्याने त्यांच्या डोक्‍याला खोच पडली. त्यांच्या मेंदूतही काही अंशतः रक्तस्राव झाला. त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्‍लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 

Video : पुण्यातील फुगेवाडी दुर्घटनेचा असा घडला थरार!

शौरी हे रविवारी संध्याकाळी लावासा येथील घराच्या अंगणात फेऱ्या मारत होते. त्यावेळी त्यांना भोवळ आली. ते जमिनीवर पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्‍याला मागे इजा झाली. त्यांच्या मेंदूलाही त्यामुळे मार बसला. त्यातून रक्तस्राव झाला. त्यामुळे त्यांना सुरवातीला हिंजवडी येथील रूबी हॉलमध्ये तातडीने दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्‍लिनिक येथे उपचारासाठी दाखल केले आहे. 

Video : पुणे : फुगेवाडी दुर्घटनेतील मजूराचा अखेर मृत्यू

याबाबत अधिक माहिती देताना मेंदूशल्यचिकीत्सक डॉ. सचिन गांधी म्हणाले, "शौरी यांना रूबी हॉल क्‍लिनिकमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. डोक्‍याला मार लागल्यानंतर ते पूर्णतः शुद्धीवर होते. ते व्यवस्थित संवाद साधत आहेत. त्यांनी रात्री दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.'' डॉक्‍टरांचे स्वतंत्र पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. 

पुणे : 'त्याने' दोघांना वाचवले पण स्वत:..(व्हिडिओ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT