पुणे

चारचाकीने केले चौघांना जखमी; राज्यमंत्र्यांचा मुलगा धावला जखमींच्या मदतीसाठी...

राजकुमार थोरात

वालचंदनगर : शेळगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीमध्ये इंदापूर-बारामती राज्यमार्गावर भरधाव वेगाने चाललेल्या चारचाकीने दोन दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातामध्ये चार दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. 

अपघातामध्ये मयूर चव्हाण, सौरभ काळे व वैभव काटकर (रा. सणसर) व आनंद राम देवाशी (मूळ रा. राजस्थान) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. शनिवारी (ता. १९) रोजी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बारामतीहून इंदापूरच्या बाजूकडे  एम.एच.१२ ईटी ९४९३ ही चारचाकी गाडी वेगाने चालली होती.

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने शेळगाव गावाच्या हद्दीमध्ये बारामतीकडे दुचाकीवरुन चाललेल्या दुचाकीला जोराची धडक देवून गाडीला फरफटत नेले. तसेच  तसेच रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी उभा असलेल्या दुचाकीस्वारला धडक दिली. अपघातानंतर चालक पळून गेला आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

राज्यमंत्र्यांच्या मुलाने दिला जखमींना मदतीचा हात-
अपघात झाल्यानंतर अर्धा तासानंतर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे विवाहसोहळा उरकून घराकडे चालले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. कुणीही मदत करण्यास तयार नव्हते.  मात्र भरणे व अंबादास लांडगे यांनी तातडीने जखमींना उचलून स्वत:ची चारचाकी गाडी ठेवले. व उपचारासाठी दवाखान्यामध्ये पाठविल्यामुळे जखमींना वेळेमध्ये उपचार मिळण्यास मदत झाली.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT