Fun-and-Fare
Fun-and-Fare 
पुणे

फन न फेअर व्यवसाय आर्थिक संकटात; सव्वाशे कुटुंबावर उपसमरीची वेळ

विठ्ठल तांबे

धायरी - मागील वर्षपासून कोरोना महामारी मुळे अनेक उद्योग व्यवसाय देशोधडीला लागले आहे. यातील लहान मुलांसाठी अनेक खेळाचे प्रकार असणारे फन न फेअर, डिझनी लँड सारख्या व्यवसायाला मोठा फाटका बसला अनेक व्यावसायिक यामध्ये अक्षरशः उध्वस्त झाले आहे. अशीच वेळ नऱ्हे येथील नवले पुलाजवळील बाहेरून आलेल्या फन न फेअर मधील  कामगार व व्यवसायिकांवर लॉकडाऊन मुळे पुन्हा अली आहे. हे व्यवसायिक आता आर्थिक संकटात सापडले आहे. यामध्ये लहान मुलांचे मनोरंजन असणारे खेळांमधील आकाशी पाळणा, ब्रेक डान्स, लहान मुलांसाठी असणारे पाण्यातील बोटिंग, रेल्वे, मिकी माउस, इत्यादी खेळ तसेच स्वस्त मध्ये मिळणाऱ्या घरगुती शोभेच्या वस्तू, मुलींसाठी असणारे सौंदर्य प्रसाधने तसेच पाणीपुरी, ओली भेळ खाद्यपदार्थांची दुकाने  इत्यादी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मागील वर्षांपासून मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील वर्षभरात धंदा नसल्याने आम्हाला अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती तीच वेळ आता अली आहे. २० ते २५ लाखांचे मागच्या वर्षी नुकसान झाले आहे. त्याचेच घेतलेले कर्ज परत फेड झाली नाही व्याज मात्र वाढतच आहे. तर त्यात यावर्षीही तीच परिस्थिती ओढवली आहे.आमच्या कडे जवळपास 125 कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे. सरकारकडे आर्थिक मदतीचे आव्हान देखील व्यावसायिकांनी केले आहे.

अश्या जत्रा भरवत असणाऱ्या व्यवसायीकांना कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. सरकार लॉकडाऊन करत असल्याने या ठिकाणी कामगारांना व व्यवसायिकांना अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षपासून हे व्यवसायिक एकाच ठिकाणी थांबून असल्याने व्यवसाय करणे खूप जिकरीचे झाले आहे. फन न फेअर सारखे व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना जर आता व्यवसाय सुरू केले नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

१) मागील वर्षाची लाखों रुपयांची वीज बिल थकीत होती. ती देखील पूर्ण भरून घेतली. नंतर यावर्षी वीज मिटर दिला गेला.
२) परवानग्या दिल्या परंतु लगेचच लॉकडाऊन झाला.
३) जागा मालक भाडे देखील माफ किंवा कमी करण्यास तयार नाही.

अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षापासून हे व्यवसायिक एकाच ठिकाणी थांबून असल्याने व्यवसाय करणे खूप जिकरीचे झाले आहे. फन न फेअर सारखे व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना जर आता व्यवसाय सुरू केले नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
- अनिल कुमार साहू, फन न फेअर मालक.

सरकारने कोरोना काळात आम्हाला व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली आणि लगेच लॉकडाउन चे कारण पुढे करत व्यवसाय बंद करण्यास सांगितला असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षीदेखील कोरोना काळात खूप मोठे आर्थिक संकटाला  सामोरे जावे लागले होते. यावर्षी ही तेच संकट उभे राहिल्यामुळे आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरला नाही. आत्महत्या करण्यासाठी सरकारनी परवानगी द्यावी..
- अकबर आली, मॅनेजर फन न फेअर

आम्ही वेगवेगळ्या राज्यामधून पोट भरण्यासाठी येतो. परंतु कोरोना महामारीमुळे काम मिळत नसल्याने आम्हाला पोटभराने देखील मुश्कील झाले आहे . यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही ज्या ठिकाणी काम करतो ते व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी.
- प्रवीण गेहलोत -दुकानदार फन न फेअर..

'व्यावसायिकांना सवलत देण्याबाबत मी नेहमी सकारात्मक आहे. सध्या परिस्थिती गंभीर होत असल्याने थोडे निर्बंध आवश्यक आहेत.येत्या काही दिवसांमध्ये परिस्थिती सुधारल्यास 'सर्कस' किंवा तत्सम व्यावसायिकांना नियम ठरवून देऊन परवानगी देण्यात येईल.'
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT