Ganeshotsav 2020 Preparations in the final stage for the arrival of Gauri in pune 
पुणे

Ganeshotsav2020 : घरोघरी गौराईच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात

सकाळवृत्तसेवा

गणेशोत्सव 2020 : पुणे : आपल्या लाडक्या 'बाप्पा'चे आगमन झाल्यानंतर आता महिला वर्गाची गौराई पुजनाची तयारी सुरू झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महिलांनी काही दिवस आधीपासूनच गौराईच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महालक्ष्मींच्या मूर्ती आणि साहित्य प्रत्यक्ष बाजारपेठेबरोबरच ऑनलाइन बाजारात देखील उपलब्ध असल्याने महिलांच्या तयारीला वेग आला. घरोघरी गौराईचे थाटामाटात आगमन करण्यासाठी महिलांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिकाधिक विक्रेत्यांनी विक्रीसाठी ऑनलाइन मार्ग निवडला आहे. महालक्ष्मींच्या मुखवट्यांपासून साडी, दागिने आणि इतर सजावट साहित्याची ऑनलाइनची सोय उपलब्ध करून दिली होती.

वरसगाव ओव्हरफ्लो; खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला

दरवर्षी तुळशीबाग, मंडई परिसरात गौरीचे मुखवटे, साडी, तयार हात, दागिने आणि इतर साहित्यासाठी झुंबड पहायला मिळते. गौरीच्या सजावटीसाठी महिलांमध्येही चुरस रंगल्याचे पाहायला मिळते. इतरांपेक्षा आपल्या गौरीची सजावट कशी आकर्षक दिसेल, यावर महिलांचा अधिक भर असतो. परंतु यंदा कोरोनाच्या सावटामुळे महालक्ष्मींचे पूजनही अनेक घरांमध्ये अगदी साधेपणाने होणार असल्याची चिन्हे आहेत. 

ऑनलाइन साडी खरेदीला पसंती
गौराई करिता साडी घेण्यासाठी प्रत्यक्ष बाजारपेठेत जाण्यापेक्षा अनेक महिलांनी ऑनलाइन साडी खरेदीला पसंती दिली. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून विक्रेत्यांनी साडी खरेदीवर आकर्षक ऑफर दिल्याने गणेशोत्सवापूर्वीच साडयांच्या ऑर्डर बुक झाल्या आणि घरपोच मिळाल्या. महिलांच्या पसंतीस पडतील अशा पेशवाई, मस्तानी, ब्राह्मणी, खण अशा विविध प्रकारातील साडया ऑनलाइनवर उपलब्ध आहेत.  साधारण ५०० रुपयांपासून ते पुढे या साड्या उपलब्ध आहेत. या ऑनलाइन विक्रीला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या धोरणावर अजित पवारांचा सावध पवित्रा; सरसकट वाहतुकीबाबत वेगळा निर्णय घेणार?​

मंगळवारी दुपारी एक वाजून ५९ मिनिटांनंतर करा गौरी आवाहन

घरोघरी मंगळवारी (ता.२५) अनुराधा नक्षत्रावर म्हणजे दुपारी एक वाजून ५९ मिनिटांनंतर गौरी आवाहन करता येणार आहे. तर बुधवारी (ता.२६) आपल्या परंपरेनुसार गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर गुरुवारी (ता.२७) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा नसते मात्र यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे. त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT