girish bapat sakal
पुणे

Girish Bapat: तीन दिवसांत पुण्यातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन

प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुण्यामध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांच्या या गैरसोयीला प्रशासन जबाबदार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"गेले दोन तीन दिवस पुण्यामध्ये सामान्य नागरिकांना अत्यंत कमी दाबाने काही ठिकाणी पाणी पुरत नाहीये ही प्रशासनाची चूक आहे. कालच माननीय आयुक्त आढावा बैठक घेतली. पाणी मिळत नाही म्हणून विविध भागांमध्ये ओरड सुरु आहे. विशेषता महिलांना त्यामुळे त्रास होत आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हे होत आहे", असं बापट म्हणाले. (Girish Bapat: Agitation if water supply in Pune is not restored in three days)

मी उद्या आयुक्तांचा घरी जाणार आहे. त्यांच्या बागेपासून ते घरापर्यंत किती दाबाने पाणी येत आहे हे पाहणार आहे, असंही बापट म्हणाले. संपूर्ण शहराला समान पाणीपुरवठा होतोय. श्रीमंतांकडे पाणी आहे आणि वाड्या वस्त्यांना दिवसांमध्ये पाणी बंद करतात. यामध्ये टँकर लॉबी सक्रिय आहे का? याचा मला संशय आहे, उद्या परवा यासाठी आमचे माजी महापौर आणि मी देखील या ठिकाणी पाहणी करणार आहे. पालकमंत्र्यांनी याबाबत योग्य लक्ष घालू असे म्हटले आहे, असं बापट पुढे म्हणाले.

लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यामुळे प्रशासनाच्या गलथान कारभार असाच चालू राहिला तर पुणेकर अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांना पळता भूई थोडी करतील. प्रशासनाला रान मोकळे झाले आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तीन दिवसात जर पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर लोकं रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. मी नेतृत्व करून पुण्यात आंदोलन करेन, असा इशाराही गिरीश बापट यांनी प्रशासनाला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Car Accident: पुण्यात भीषण अपघात! झाडाला एवढी जोरदार धडक की उन्मळून पडले, कारचा चक्काचूर... चालक स्टेअरिंगमध्ये अडकला

Bride Runs Away With Cash : लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरी फरार; पती मिठाई आणायला जाताच रस्त्यात सोडून दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठा बदल! खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली; महाराष्ट्रात 10 ग्रॅमचा भाव किती?

Nashik Shalarth Scam: १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठा ट्विस्ट; फार्महाऊसवर लपलेल्या संस्थाचालकाला अटक, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Local: लोकलचा स्पीड आणखी वाढणार, दररोज ४,००० फेऱ्या; रेल्वे प्रशासनाची नवी योजना, कधीपासून होणार सुरु?

SCROLL FOR NEXT