ajit pawar sakal media
पुणे

बारामतीत साकारणार शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय व रुग्णालय

मिलिंद संगई, बारामती..

बारामती : मेडीकल कॉलेजपाठोपाठ आता बारामतीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय (बी.ए.एम.एस.) व 100 खाटांच्या क्षमतेचे संलग्नित रुग्णालय उभारले जाणार आहे. राज्य शासनाच्या आयुष संचालनालयाने पुण्याच्या जिल्हाधिका-यांना या बाबत पत्र पाठवून माहिती दिली आहे. बारामतीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासाठी जिल्हाधिका-यांनी बारामती मोरगाव रस्त्यावरील मेडद येथील गट क्रमां 414 येथील 5.87 हेक्टर जागा प्रस्तावित केली आहे. या महाविद्यालय व रुग्णालयासाठी किमान पाच एकर जागेची अट आहे. त्या मुळे येथे ही अट पूर्णत्वास जात असल्याने लवकरच आता या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी तयारी सुरु होणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून हे महाविदयालय बारामतीत साकारणार आहे. या मुळे आयुर्वेदीक पध्दतीने उपचार पध्दतीचे प्रशिक्षण बारामतीत विद्यार्थी घेऊ शकतील, शिवाय ज्यांना आयुर्वेदीक पध्दतीने उपचार घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठीही 100 खाटांच्या क्षमतेचे सर्व सुविधांनी सज्ज असेल रुग्णालयही उभारले जाणार आहे.

बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले असून आता यंदा तिसरी बॅच या महाविद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणार आहे. या महाविद्यालयाला जोडून 500 खाटांचे सुसज्ज रुग्णालयही उभे राहिले आहे. आता आयुर्वेदीक महाविद्यालयामुळे वैदयकीय शिक्षणाचाही हब म्हणून बारामतीची ओळख होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापाठोपाठ आता बारामती शैक्षणिक हब म्हणून उदयास आले असून या महाविद्यालयामुळे आता बारामतीच्या नावलौकीकात आणखी भर पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

Moong-Rava Bites: खायला टेस्टी, तब्येतीसाठी बेस्ट; मूग आणि रव्यापासून बनवा हाय-प्रोटिन खुसखुशीत बाईट्स!

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

SCROLL FOR NEXT