Government order caused to fail 200 students Of garware college in 11th Exam: 
पुणे

शासनाच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना फटका; गरवारे महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी अकरावीत नापास

ब्रिजमोहन पाटील, सकाळवृत्तसेवा

पुणे : इयत्ता ११वी मध्ये कधी कोणी नापास झाल्याचे आपण ऐकले आहे का? तर याचे उत्तर नक्कीच नाही असे येते. मात्र, शिक्षण विभागाने ११वीच्या विद्यार्थ्यांचे पहिल्या सत्राचे गुण व अंतर्गत मूल्यांकनावर १२वीत प्रवेश द्यावा असे आदेश 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर घेतला. याचा फटका आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसला असून, या विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याने पालक, विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'च्या साथीमुळे शिक्षण विभागाने १३ एप्रिल रोजी इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षा, प्रॅक्टीकल यासह इतर अंतर्गत मूल्यांकनावर १२वीत प्रवेश द्यावा असे आदेश दिले होते. त्यानुसार गरवारे महाविद्यालयाने अंतर्गत मूल्यांकनावर व प्रथम सत्र परीक्षेच्या आधारे २६ मे रोजी ११वीचा निकाल जाहीर केला. यामुळे विज्ञान शाखेचे १४७  तर कला शाखेचे ६० विद्यार्थी नापास झाले आहेत. 

पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात

नापास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना अंतिम फेरीत सप्टेंबर महिन्यात प्रवेश मिळाला. त्यानंतर लगेच एका महिन्याने प्रथम सत्र परीक्षा झाली, अनेक विद्यार्थी मराठी माध्यमातून १०वी पास झाल्याने त्यांना अभ्यासक्रम अवघड वाटत होता. त्यामुळे हे विद्यार्थी काही विषयात नापास झाले होते, पण द्वितीय सत्राची परीक्षा झाली असती तर नक्कीच चांगले गुण मिळाले असते, याचा विचार निकाल लावताना झाला नाही, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार केल्याचे युवासेनेचा सागर अलकुंटे आणि सामाजिक कार्यकर्ते अमर जमदाडे यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षण विभागाकडे यासंदर्भात तक्रारी गेल्या असून याची चौकशी करून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण अधिकार्यांना दिले आहेत.

Video : पुण्यातील धरणांबाबत महत्त्वाची बातमी

प्राचार्य पी. बी. बुचडे म्हणाले, " शासनाने जसे आदेश दिले त्यावरून निकाल लावला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून याबाबत शासनाकडे या मुलांना उत्तीर्ण करण्याबाबत विचारणा केली जाईल. शासनाने या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी किंवा उत्तीर्ण करावे असे आदेश दिले तर त्यानुसार कार्यवाही केली जाईल."

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"माझ्या मुलाला १०वीत ७७ टक्के गुण होते, अर्ज भरल्यानंतर  केंद्रित पद्धतीने गरवारे महाविद्यालयात शेवटच्या फेरीत प्रवेश मिळाला. तो पर्यंत काही अभ्यासक्रम शिकवून झाला होता. प्रवेशानंतर लगेच एका महिन्यात परीक्षा झाली. यात काही विषयात त्याला अपयश आले. पण त्यांना थेट ११वीत नापास केले आहे. अशाच प्रकारे महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यांना संधी मिळाली यासाठी शासनाने निर्णय घ्यावा."
- सोनाली घोडके, पालक

पुणेकरांनो लॉकाडाउन वाढला; पण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन शक्य आहे!

"११वीत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना दोनतीन महिने काहीच समजत नाही. तेवढ्यात परीक्षा झाली, या परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना नापास केले आहे. महाविद्यालय व शासनाने नियमांचा पुनर्विचार करून विद्यार्थ्यांना १२वीत प्रवेश दिला पाहिजे."
- जगदीश जाधव, पालक

"११वीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची चौकशी करून यासंदर्भात तोडगा काढला जाईल."
- गणपत मोरे, शिक्षण अधिकारी, माध्यमिक
पुण्यात हे काय चाललंय, रोज `एवढे` जण करताहेत आत्महत्या; ही आहेत कारणे...​​

दुसऱ्या सत्रात कामगिरी सुधारते
''
११वीला प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीचे दोन तीन महिने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, इंग्रजी माध्यम याचा आवाका लक्षात येत नाही, त्यामुळे पहिल्या सत्राचा निकाल चांगला लागत नाही. पण दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारत असते, पण ही संधी या २०० विद्यार्थ्यांना मिळाली नाही, याचा विचार झाला पाहिजे,'' असे एका प्राध्यापकाने सांगितले.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT