Gram Panchayat Election Result 2021, Bhor, Mulshi, Pune 
पुणे

Election Result 2021 : लक्षवेधी! समान मते पडली आणि 6 वर्षांच्या चिमुरडीने निवडला विजयी उमेदवार

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे : राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडुकीचे कल हाती येऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील दोन तालुक्यात उमेदवारांना समान मते पडल्याचे समोर आले आहे. मत पेटीत गावकऱ्यांनी दिलेल्या मतांची गोळाबेरीज समान झाल्यानंतर चिठ्ठी टाकून उमेदवारांची निवड करण्यात आली. भोर तालुक्यातील दिवळे आणि वेळू गावासह मुळशी तालुक्यातील एका गावात उमेदवारांना समान मते पडली. 

मतमोजणीच्या पहिल्या  फेरीत भोर तालुक्यातील दिवळे आणि वेळू गावातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून विजय उमेदवार निवडण्यात आला. यामध्ये दिवळे गावातून निलेश पांगारे आणि वेळू गावातून सारिका जाधव हे निवडून आले आहेत. पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून केवळ एका प्रभागाची निवडणूक  असलेल्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. मतमोजणी कक्षाबाहेर राजकीय कक्षांच्या कार्यकर्त्यांनी व इतर नागरिकांनी गर्दी केली आहे. निकाल जाहीर झाल्यावर बाहेरील संबंधित ग्रामपंचायतीचे नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत.

उत्तम नियोजनामुळे मतमोजणी कक्षात ना दंगा ना गोंधळ

प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये   ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रात कुठलाही दंगा व गोंधळ होत नाही. मतमोजणी शांततेत सुरू असून मतमोजणी कर्मचारी आनंदाने कार्यरत आहेत. मतमोजणीसाठी प्रथमच सर्वोत्तम नियोजन झाले आहे. 

प्रशासनाने मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसाठी उमेदवार किंवा त्यांच्या एका प्रतिनिधी ठराविक रंगाची ओळखपत्र दिलेली आहेत. त्यामुळे एका फेरीसाठी ठराविक रंगाच्या ओळखपत्राशिवाय इतरांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी मतमोजणी शांततेत सुरु आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या आवारात बाहेरच पोलिसांनी कळक बंदोबस्त ठेवलेला आहे याशिवाय चौपाटी येथील मांढरदेवी मार्गावरील रस्ता  अडवून अत्यावश्यक सेवेशिवाय इतर वाहनांना प्रवेश दिला नाही त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाहेर वाहनांची संख्याही तुरळक होती उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना चौपाटीपासून पायी चालत जावे लागले.

मुळशी तालुक्यातील चाले गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही दोन महिला उमेदवारांना समान मते पडल्याचे पाहायला मिळाले. सीमा दहीभाते यांचे नशीब उजळले. आणि त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. या ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये रंजना अशोक दहीभाते आणि सीमा श्रीरंग दहीभाते या दोघी एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या. दोघीँनी मतदारापर्यंत पोचत कसून प्रचार केला. दोघींसाठीही माहेर आणि सासरकडील नातेवाईकही पळाले. त्यामुळे दोघीत कोण विजयी होणार याची ग्रामस्थांना उत्सुकता होती. तथापि मतमोजणीत दोघींनाही समसमान 176 मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार अभय चव्हाण यांनी दोघींत चिठ्ठी टाकण्याचा निर्णय घेतला. शिवन्या समीर जाधव या सहा वर्षीय चिमुरडीने एक चिठ्ठी उचलली. त्यात सीमा दहीभाते यांचे नशीब उघडले. चव्हाण यांनी त्यांच्या विजयाची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT