पुणे

Coronavirus : संसर्ग रोखण्यासाठी मावळात युद्धपातळीवर प्रयत्न; गावे निर्जंतूक करण्याची ग्रामपंचायत स्थरावर उपाययोजना 

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ - कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी मावळ तालुक्‍याच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ग्रामपंचायत स्तरावर साफसफाई, ग्रामस्थांमध्ये जनजागृती, सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरणाची फवारणी अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. 

मावळ तालुक्‍यात कोरोना विषाणूचा संसर्ग असलेला एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. परंतु पुणे-मुंबई शहरांच्या मध्यवर्ती तालुका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य खात्याच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने परदेशवारी करुन आलेले व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. आता परदेशवारी करुन येणाऱ्यांचा ओघ पूर्णपणे थांबला असला तरी पुणे-मुंबईहून येथे वास्तव्यास येणाऱ्यांचा ओघ मात्र कायम आहे. आरोग्य खाते व स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. शहरी भागात साफसफाई, निर्जंतुकीकरण, गर्दी टाळण्यासाठी सोशल डिस्टसिंगसाठी उपाययोजना राबविण्यात येत आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही ग्रामपंचायतींमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बाळासाहेब दरवडे, महादेव कांबळे, एम. टी. कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपाययोजना केल्या जात आहेत. 

ग्रामपंचायतींकडून उपाययोजना 
- ग्रामसेवक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटूंब भेटी 
- कुटुंबातील साठ वर्षे वयावरील नागरिक, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती, गर्भवती माता आदींच्या या 
- बॅनर्स, फ्लेक्‍सद्वारे जनजागृती सुरू 
- चौदावा वित्त आयोग व ग्रामनिधीतून ग्रामस्थांना डेटॉल साबण, हॅन्डवॉश, सॅनिटायझरचे वाटप 
- गावातील सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई 
- गटारांमध्ये तुंबलेला कचरा काढून ती प्रवाही करणे सुरू 
- एक टक्का सोडियम हायपोक्‍लोराईड या द्रव्याची फवारणी 
- शाळा, वसतिगृहे, मंगलकार्यालयांमध्ये पन्नास खाटांचे विलगीकरण कक्ष 

जगातील पहिली घटना; अमेरिकेत कोरोनामुळे लहान बाळाचा मृत्यू

मावळातील होम क्वारंटाइनची स्थिती 
परदेसश वारी केलेले - 96 
परेदश वारी केलेल्यांच्या संपर्कातील - 122 
पुणे,मुंबईहून फर्महाऊसमधील - 3000 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT