auto riksha  
पुणे

पुण्यात रिक्षाचालकांना उद्यापासून अनुदान

पुण्यात ७२ हजार तर पिंपरीत २० हजार रिक्षाचालक लाभार्थी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रिक्षाचालकांना अनुदान देण्याचा तिढा अखेर सुटला असून, येत्या २२ मे पासून त्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि बारामतीमधील एकूण १ लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. दरम्यान, हे अनुदान मिळण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात गुरुवारी आंदोलन केले.

रिक्षाचालकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या महिन्यात घोषणा केली होती. त्यानुसार प्रत्येक रिक्षाचालकाला १५०० रुपये देण्यात येईल, असे म्हटले होते. परंतु, त्यासाठीची संगणक प्रणाली तयार झाली नव्हती. त्यामुळे हे अनुदान रखडले होते. या पार्श्वभूमीवर आता शनिवारपासून अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी आयसीआयसीआय बॅंकेने प्रणाली तयारी केली आहे. राज्यात ७ लाख २२ हजार रिक्षाचालकांना अनुदान देण्यात येणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात या कामासाठी ४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना शुक्रवारी दुपारी एकला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी तीनला रिक्षाचालक संघटनांच्या प्रतिनिधींना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल. शनिवार- रविवारही हे काम सुरू राहणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली.

पुणे शहरात ७२ हजार, पिंपरी चिंचवडमध्ये २० हजार आणि बारामतीमध्ये सुमारे २ हजार पात्र रिक्षाचालक आहेत. अन्य सहा हजार घटक आहेत, असेही त्यांनी सांगितले.खासदार बापट यांनी आरटीओ कार्यालयात गुरुवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले. लवकर पैसे रिक्षा चालकांच्या खात्यात जमा करावेत, असे निवेदन आरटीओ शिंदे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी नगरसेवक उमेश गायकवाड, रिक्षा संघटनेचे बाबा कांबळे, बापू भावे, बादशहा सैयद, माजी नगरसेवक उज्वल केसकर, पुणे शहर भाजपचे उपाध्यक्ष स्वरदा बापट तसेच पुष्कर तुळजापूरकर, सतीश मोहोळ आदी उपस्थित होते.

असे मिळणार अनुदान

१) वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक आणि आधार क्रमांकाची माहिती रिक्षाचालकांनी संगणक प्रणालीवर ऑनलान

भरायची आहे.

२) माहितीची पडताळणी झाल्यावर रिक्षाचालकाच्या खात्यात १५०० रुपये अनुदान जमा होईल.

३) तत्पूर्वी रिक्षाचालकाचा आधार कार्ड क्रमांक आणि बॅंक खाते लिंक होणे गरजेचे आहे.

४) कोठेही कागदपत्रे जमा करायची गरज नाही, असे आरटीओने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Coach : इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर, अँडी फ्लॉवर RCB ची साथ सोडणार? मोठी अपडेट्स आली समोर

Satana News : 'एक रुपयात पीक विमा योजना' तात्काळ पूर्ववत सुरू करा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे संजय चव्हाण यांची आग्रही मागणी

Latest Marathi News Live Update : आयपीएस अनुराग कुमार यांनी आज दिल्ली पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

'प्रायव्हेट जेट' ऐकलं असेल पण संपूर्ण रेल्वे ट्रेन बुक करता येते! भारतीय रेल्वेची खास 'FTR' सुविधा...

Kasari Sonarmala Road: कासारीतील सोनारमळा रस्ता वर्षानुवर्षे दुरावस्थेत; ग्रामस्थांचा ‘रस्ता देता का’ असा आक्रोश

SCROLL FOR NEXT