Great relief to the companies in the state from the provident fund office.png 
पुणे

राज्यातील कंपन्यांना 'पीएफ'मुळे 'असा'ही मिळणार दिलासा!

सकाळवृत्तसेवा

 पुणे : केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने देशभरातील कंपन्यांना दिलासा दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात कंपन्या बंद राहिल्यामुळे अनेक कंपन्यांना भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम मुदतीत भरणे शक्‍य झालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दंड न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी राज्यातील 43 हजार 191 तर पुणे शहरातील 18 हजार 810 कंपन्यांना याचा फायदा मिळणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून नुकतेच या बाबतचे परिपत्रक लागू करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे सर्व कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले होते. या कालावधीत कंपन्यांना पीएफची रक्कम जमा करणे शक्‍य झाले. त्यामुळे मुदतीत पीएफ जमा न झाल्यामुळे त्यावर आकारला जाणार दंड माफ करावा, अशी मागणी कंपन्यांकडून केली जात होती. त्याबाबतचा निर्णय अखेर भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून घेण्यात आला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कंपन्यांना दर महिन्यांच्या पंधरा तारखेच्या आता कंपनीचा आणि प्रत्येक कामगारांचा हिश्‍श्‍याची रक्‍कम जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत पीएफची रक्कम जमा न केल्यास त्यावर दोन महिन्यांपर्यंत पाच टक्के, त्यापुढे चार महिन्यांपर्यंत 10. सहा महिन्यांच्या आत भरला नाही, तर 15 टक्के आणि सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ विलंब केल्यास 25 टक्‍क्‍यांपर्यंत दंड आकारण्यात येतो. तो आता पुढील आदेश होईपर्यंत न आकारण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने घेतला, असे क्षेत्रीय आयुक्त अजय कुमार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

हृदय पिळवटून टाकणारी कहाणी : '...ते माहीत नाही, पण आमचे मात्र कुटुंब उद्‌ध्वस्त झाले'

राज्यातील कंपन्यांची संख्या 43 हजार 191 
पुण्यातील कंपन्यांची संख्या 18 हजार 810 

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू 

पीएफ कोणाला भरावा लागतो 
वीस कामगारांपेक्षा अधिक कामगारांची संख्या आहे. अशा कंपन्यांना भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच दर महिन्याच्या पंधरा तारखेच्या आत कंपनीचा आणि कामगारांचा हिस्सा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा करणे बंधनकारक आहे. 

 शिफ्ट संपली की जबाबदारी संपली; पुण्यात खाकी वर्दीच्या बेपर्वाईने 'त्या' रुग्णाचा मृत्यू

''केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. माझे छोटे युनिट आहे. चाळीस कामगार आहेत. लॉकडाऊनमुळे दोन महिने पीएफ जमा करणे शक्‍य झाले नव्हते. दोन महिने कारखाना बंद राहिल्यामुळे लॉकडाऊन नंतर पीएफ आणि त्यावरील दंड भरणे शक्‍य नव्हते. या निर्णयाने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.''
- गणेश चव्हाण ( उद्योजक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Provident Fund: PF धारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 31 लाख खातेधारकांना काही न करता मिळणार 11,000 कोटी; जाणून घ्या कधी?

Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्‍या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

SCROLL FOR NEXT