pune rain news 
पुणे

Pune Rain : पुण्यात आजही मुसळधार! गारांसह पावसाला सुरूवात...

Sandip Kapde

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोबत गारांचा मारा देखील सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात देखील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे.

दरम्यान पुणे शहरासह उपनगरांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पुण्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

त्यानुसार आज पुण्यातील कोथरूड परिसरात पावसाला सुरूवात झाली आहे. गारा आणि वारे देखील वाहत आहे. त्यामुळे नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच मध्य पुण्यात देखील पावसाला सुरूवात झाली आहे. खडकी, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, धनकवडी परिसरात दखील जोरदार पाऊस सुरु झाला आहे.

एकीकडे उकाडा जाणवत आहे तर पाऊस देखील पडत आहे. पुण्यात पुढील २ दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज आणि उद्या शहरात जोरदार पावसाचा होण्याची शक्यता आहे. यासोबच उष्णतेचा पारा देखील वाढणार आहे. तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

आज (ता. १५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा (Rain Forecast) इशारा आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: रत्नागिरीत निकालाआधी धडधड वाढली, सत्तेचं गणित कोणाच्या बाजूने झुकणार?

Zilla Parishad Elections Result : निकालाआधीच महायुतीने मारली बाजी, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या २७ जागा बिनविरोध, पाहा विजयी उमेदवारांची यादी!

ZP election counting update : कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल किती वाजता लागणार?, प्रशासनाची जय्यत तयारी

Sindhudurg ZP Election Results : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांचा कौल कुणाला? आज चित्र होणार स्पष्ट; सावंतवाडीत सर्वाधिक ६९.८४ टक्के मतदान

Satara ZP Election Results : राजकारणातला 'गब्बर' साताऱ्यात बाजी मारणार? बहुमतासाठी 33 जागांचं गणित; पहिला निकाल 11 पर्यंत लागणार!

SCROLL FOR NEXT