Pune Traffic Jam  esakal
पुणे

Pune Traffic Jam: चार चाकी गाडीचा अपघात झाल्याने सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Pune traffic jam: पुण्यात सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. एका चारचाकी गाडीचा अपघात रस्त्यावर झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सिंहगड रस्ता माणिक बाग येथे अचानक एका चार चाकी गाडीचा अपघात झाल्याने रस्त्याला दुपारी अडीच वाजता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सिंहगड वाहतूक पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार बर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार धायरी कडून माणिकबागकडे जाणाऱ्या दिशेला वीर बाजी पासलकर उड्डाण पुलाच्यापुढे फन टाईम थिएटर जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी समोर असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली.

धायरीकडून माणिक बागेच्या दिशेने ही गाडी निघाली होती. वडगाव पुलाच्या सिग्नल जवळ सिग्नल सुटल्यानंतर ही गाडी भरधाव वेगाने माणिक बागेच्या दिशेने निघाली होती.

परंतु नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात झाला. सुदैवाने चालकाला मोठी इजा झाली नाही तसेच केवळ चालकच गाडीत होता इतर कोणी गाडीत नव्हते. (Pune Marathi News)

उड्डाणपुलासाठी खड्डे खोदले होते.  तेथे पुलाच्या खांबांचे काम सुरू आहे. अशा खड्ड्यात ती गाडी जाऊन पडल्याने गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.  

त्यात ती गाडी पडल्याने रस्त्याला वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे,  धायरीकडून माणिकबाग कडे जाणाऱ्या दिशेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मुंबईत ऐन दिवाळीत दुर्घटना, चाळीत आग लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघे जखमी

Nagpur Fraud: नागपूर शहरात घट्ट होतोय ‘डिजिटल अरेस्ट’चा विळखा; सेवानिवृत्त अधिकारी टार्गेट; ७५ लाखांपेक्षा अधिकची फसवणूक

Latest Marathi News Live Update : मधुराईत कागद आणि भंगार धातू साठवणाऱ्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

SCROLL FOR NEXT