ganesha.jpg 
पुणे

पुणे महापालिकेचा 'हा' अट्टाहास गणेश मूर्ती विक्रेत्यांना देशोधडीला लावणारा

सकाळवृत्तसेवा

कोथरुड (पुणे) : दरवर्षी गणेशोत्सवामध्ये कोट्यावधींची उलाढाल होत असते. परंतु यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा काय होणार याची चिंता सर्वांनाच पडली आहे. ऑनलाईन गणेश मूर्ती खरेदी करावी यासाठी महापालिकेने आवाहन केल्याने स्टाॅल लावून गणेश मूर्ती विकणाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आम्ही पुरेशी काळजी घेवून विक्री करत असताना ऑनलाईन खरेदीसाठी महापालिकेचा अट्टाहास हा छोट्या विक्रेत्यांना देशोधडीला लावणारा आहे.

महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांना सरकारी आदेश समजल्याने अनेक नागरीकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे वळल्याने स्टॉलधारक मूर्ती विक्रेत्यांना नुकसानीच्या भयाने ग्रासले आहे. अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद नसल्याने व्यवसायातील नुकसान कसे टाळावे याची चिंता किरकोळ विक्रेत्यांना पडली आहे.

अमेझॉनवर जी नऊ इंची मूर्ती अडीच हजाराला मिळते ती आम्ही जास्तीत जास्त साडेसातशेपर्यंत विकतो. नागरिकांवर चुकीचे निर्बंध लादल्याने स्थानिक विक्रेते अडचणीत आले आहेत. अमेझॉनची संपत्ती वाढवण्यापेक्षा छोट्या विक्रेत्यांना कसे जगवता येईल याचा विचार प्रशासनाने करावा.

-सीताराम खाडे, विक्रेते

 

मुर्तीचा आकार किती असावा याबद्दल महापालिका, सरकार व राजकीय नेते यांचे आवाहन, घोषणा आणि नियमावली यामध्ये विसंगती असल्याने लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे. मुर्ती विसर्जीत कोठे करायची, फिरता हौद कसा आणि कुठे कुठे, केव्हा येणार, त्याचे वेळापत्रक काय ठरवले आहे. महापालिका करत असलेल्या अशा फुटकळ उपाय योजना कोरोना नियंत्रणास उपयोगी ठरणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासन व राज्यकर्ते दोघेही संभ्रमात असल्याने नागरीकांची तारांबळ होत आहे.

-अविनाश दंडवते, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

जे बात! हात हातात येणार, शरूच्या प्रेमात शायनरची विकेट पडणार; 'सनई चौघडे' मध्ये नवा ट्विस्ट, प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

बर्थडेला शेतात राबली प्राजक्ता माळी; ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच’ म्हणत केली भात लावणी, Viral Video

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT