borghat.jpg 
पुणे

लोणावळा-खंडाळ्याला जाताय, पुणे-मुंबई एक्सप्रेसवर काय आहे वाहतूकीची स्थिती पाहा...

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात शनिवारी (ता. २८) वाहनचालकांना सकाळपासूनच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

नाताळच्या सुट्ट्या आणि थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी विकेंडला बाहेर पडलेल्या पर्यटकांच्या आनंदावर यामुळे विरजण पडले आहे. बोरघाटात टाटा कॅंप ते अमृतांजन पुल दरम्यान वाहतुक कोंडी झाली आहे.

त्यामुळे द्रुतगतीवर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर रांगां लागल्या आहेत. द्रुतगती मार्गावर वाहनांची वाढलेली संख्या व त्यात बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ काही वाहने बंद अचानक बंद पडल्याच्या घटना घडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने वाहने कोंडीत अडकली आहेत. वाहतुक संथगतीने सुरु असल्याने पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

वाहतुक सुरळीत करताना बोरघाट (दस्तुरी), खंडाळा टॅपच्या वाहतुक पोलिसांना नाकी-नऊ आले आहे. खंडाळा एक्झिट, तसेच लोणावळा शहरात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही अपोलो गॅरेज ते कुमार रिसाॅर्ट दरम्यान वाहतुक संथ गतीने सुरु आहे.

खालापूर टोलनाक्यावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याने वाहनचालकांना टोल भरण्यासाठीही बराच वेळ ताटकळत रहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मजा करण्यासाठी बाहेर पडताना जरा विचार करुनच बाहेर पडावे किंवा अन्य मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफीत रनफेस्ट! अहमदाबादमध्ये कर्नाटकचा महापराक्रम; झारखंडची मोठी धावसंख्या अपुरी

''तेव्हाच बदला घ्यायला पाहिजे होता'', अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीची सोळा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; पीडितेचा टाहो

Pratap Sarnaik: नसबंदी नाही, बिबट्या दत्तक योजनेची गरज; प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन

Dhule Municipal Election : कोणाला 'हो' म्हणावे अन् कोणाला 'नाही'? इच्छुकांच्या गर्दीने भाजपचे नेते 'स्ट्रेस'मध्ये

SCROLL FOR NEXT