Rajesh_Tope 
पुणे

कोरोना निदानाच्या शुल्काला राज्य सरकारने लावली कात्री; चाचणीचे दर निम्म्यावर!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना संसर्गाच्या रोगनिदान चाचणीच्या शुल्काला राज्य सरकारने कात्री शनिवारी (ता.१३) कात्री लावली. त्यामुळे साडेचार हजार रुपयांना होणारी चाचणी आता रुग्णालयात २ हजार २०० रुपयांना होईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्णाची कोरोना निदानासाठी रुग्णालयात नमूने घेतले तर त्या चाचणीचा खर्च २ हजार २०० रुपये आकारण्यात येईल. तर, रुग्णाच्या घरी जाऊन नमूने संकलित केल्यास त्या शुल्कात ६०० रुपये वाढ होईल. त्यामुळे रुग्णाच्या घरी जाऊन नमूने घेण्याचा खर्च आता २ हजार ८०० रुपये निश्चित केला आहे. राज्यात यापूर्वी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधून साडेचार हजार रुपये रोगनिदान चाचणीसाठी आकरण्यात येत होते. यात राज्य सरकारने आता सुमारे निम्म्याने दर कमी केले आहेत. 

खासगी प्रयोगशाळेतील कोरोना रोगनिदान चाचणीच्या शुल्कात कपात करण्यात येणार असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘सकाळ ‘ने ९ मे रोजी प्रसिद्ध केले होते. या शुल्क पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी तयार होऊन सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्या बाबत आरोग्य मंत्र्यांनी आज अंतिम निर्णय घेतला.  
हे शुल्क निश्चित करताना समितीने प्रयोगशाळेतील वीज बिलापासून ते डॉक्टरांच्या वेतनापर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे. रुग्णाचा घेतलेला स्वाब प्रयोगशाळेपर्यंत आणण्यासाठी रिएजंट आणि लिक्विड लागते.

तसेच, प्रत्यक्ष तपासणीसाठी रोगनिदान किट आवश्यक असते. याच बरोबर पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट) अत्यावश्यक आहे. अशा प्रत्येक घटकाच्या किंमतीवर समितीमध्ये अभ्यास करण्यात आला. प्रत्येक चाचणीची साडेचार हजार रुपये शुल्क निश्चित केले तेव्हा रिएजंट परदेशातून आयात करत होतो. ते आता देशात उत्पादन होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर आता कमी झाल्याने कोरोना रोगनिदान चाचणीचे शुल्कदेखील कमी करण्यात आले आहे. 

निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास खासगी प्रयोगशाळांवर कारवाई केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कोरोनाचे निदान करणाऱ्या ८३ प्रयोगशाळा असून त्यापैकी ५० प्रयोगशाळा सरकारी तर, ३३ खासगी प्रयोगशाळा आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

“साहेब, मी नोकरी सोडली अन् तिकीट गद्दारांना?” छत्रपती संभाजीनगरमध्ये निष्ठावंत BJP कार्यकर्त्यांचा तुफान राडा, पेट्रोल कॅनसह आक्रमक आंदोलन

Jalgaon Gold And Silver Price : जळगावच्या सुवर्णबाजारात मोठी घसरण! चांदी ११ हजार तर सोने १७०० रुपयांनी स्वस्त

Rehan Vadra : अवीवा बेग होणार प्रियांका गांधींची सून, मुलगा रेहान करतो काय?

Nashik Tapovan Controversy : नाशिकच्या अस्मितेवर घाला! १९८९ नंतर सरकारी दप्तरातून 'तपोवन' नावच गायब

मलायका अरोराच्या रेस्टॉरंटमध्ये खिचडी खायला किती पैसे मोजावे लागतील? पाण्याच्या बाटलीची किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT