Fire
Fire Sakal
पुणे

सिगारेट न दिल्याच्या रागातून पेट्रोल टाकून पेटविले घर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लॉकडाऊनमध्ये पानटपरी बंद असल्याने सिगारेट (Cigarette) देण्यास नकार देणाऱ्या वृद्ध पानटपरी चालकाचा गळा दाबून टोळक्‍याने (Gang) त्यांचे घर (Home) पेट्रोल (Petrol) टाकून पेटवून (Fire) दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. केवळ तेवढ्यावरच न थांबता दोन ठिकाणी दरोडा टाकून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यालाही मारहाण करीत दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी हडपसरमधील चिंतामणी नगर परिसरात घडली.

नोमन सय्यद व मोठा पणती उर्फ रिझवान शेख (रा. चिंतामणी नगर हडपसर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सय्यद, शेख व आत्तु अन्सारी या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, दहशत निर्माण केल्याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरिफ रफिक सय्यद (वय. 33, रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या वडीलांची चिंतामणी नगर परिसरात पानटपरी आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लागू केलेल्या संचारबंदीमध्ये त्यांची पानटपरी बंद आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी सय्यद व शेख हे दोघेजण त्यांच्या साथीदारांसह फिर्यादीच्या वडीलांच्या पानटपरीच्या ठिकाणी आले. त्यांनी पानटपरीवर दगड मारून शिवीगाळ फिर्यादीच्या वडीलांकडे सिगारेटची मागणी केली. त्यांनी लॉकडाऊनमुळे पानटपरी बंद असल्याने सिगारेट देण्यान नकार दिला. त्यावेळी त्यांनी फिर्यादीच्या वडीलांना शिवीगाळ करून त्यांचा गळा दाबला. या घटनेत ते बेशुद्ध पडले. त्यानंतर फिर्यादीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर फिर्यादी हे घराबाहेर थांबले असताना, आरोपींनी तेथे येऊन फिर्यादीलाही शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत दररोज फुकट सिगारेट देण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्याचबरोबर फिर्यादी रुग्णालयात गेल्यानंतर त्यांच्या घरावर पेट्रोल ओतून घर पेटवून दिले.

आरोपींनी दुकानांवर दरोडा टाकत पेट्रोल पंपाचे कार्यालयही फोडले

याच गुन्ह्यातील आरोपींनी सोमवारी सकाळी चिंतामणी अमृततुल्य या चहाच्या दुकानात जावून सागर राजकुमार राठोड (वय.20,रा. सय्यदनगर हडपसर) यास कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गल्ल्यातील आठशे रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर आरोपींनी मगर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.तसेच पंपावरील मॅनेजरच्या केबीनमध्ये घुसून केबीनची तोडफोड करीत मॅनेजर बाळू अंभोरे यांना मारहाण केली. याप्रकरणी केवलराम लादुराम परमार (वय. 41, रा. चिंतामणी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी तेथील नवदुर्गा किराणाची तोडफोड करून तीन हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT