School 
पुणे

मोफत शिक्षणासाठीचे जवाहर नवोदय विद्यालय; कसा आणि कुठे करायचा अर्ज?

सकाळवृत्तसेवा

पुणे - देशातील गुणवंत, गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यातच मोफत दर्जेदार शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. यानुसार भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वजिल्ह्यातच उच्च दर्जाच्या मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा या जिल्ह्यानिहाय नवोदय विद्यालय सुरू करण्यामागचा केंद्र सरकारचा मुख्य हेतू आहे. केंद्र सरकारने १९८६ मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (नॅशनल एज्युकेशन पाॅलिसी) मंजूर केले आहे. या धोरणातील तरतुदीचाच एक भाग म्हणून भारतातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक जवाहर नवोदय विद्यालय सुरू केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेली ही स्वायत्त संस्था आहे. येथील अभ्यासक्रम हा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) असतो.

या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता सहावीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. मात्र या संस्थेत शिक्षण घेण्यासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नि: शुल्क शिक्षण देण्यात येते. निवास व भोजनाची मोफत सोय केली जाते. याशिवाय गणवेश, पाठ्यपुस्तके, क्रीडा साहित्य, लेखन सामग्री, स्टेशनरी आदींचा सर्व खर्चही विद्यालयामार्फतच करण्यात येतो. या विद्यालयातील एकूण प्रवेशांपैकी ७५ टक्के जागा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रवेशासाठी दरवर्षी लेखी परीक्षा घेण्यात येते. या परिक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

प्रवेशासाठी पात्रता निकष

  • इच्छुक विद्यार्थी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असावा
  • फक्त स्वत:च्या जिल्ह्यातच प्रवेश घेता येतो
  • संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही एका शाळेत प्रवेश असणे अनिवार्य
  • प्रवेशासाठी निश्र्चित केलेली वयाची अट पुर्ण करावी लागते
  • लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे 

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याबाबतचा सक्षम पुरावा
  • जन्म प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास, जात प्रमाणपत्र
  • अर्जदार विद्यार्थ्याची दोन छायाचित्रे.

अर्ज कोठे कराल? 
या प्रवेशाबाबतच्या लेखी परीक्षेची जाहिरात दरवर्षी स्थानिक पातळीवरील दोन नामवंत दैनिकांत प्रसिद्ध होत असते. आपला पाल्य शिक्षण घेत असलेल्या शाळांकडे आपापल्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या पत्ता उपलब्ध असतो. जाहिरातीत दर्शविलेल्या ठिकाणी अर्ज करावा लागतो.
संकलन - गजेंद्र बडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT