Rain_Stormy_winds 
पुणे

वादळी वाऱ्यामुळे पुण्यातील कोरोनाचा उद्रेक कमी होणार? तज्ज्ञांचे म्हणणे...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विजांच्या कडकडाटासह धो-धो कोसळणाऱ्या अवकाळी पावसाचा नेमका कोणता परिणाम कोरोनाच्या विषाणूंवर होणार, याची निश्चित माहिती अद्याप पुढे आलेली नाही. त्यामुळे या पावसाने पुण्यातील कोरोनाचा उद्रेक कमी होईल, असे खात्रीशीरपणे सांगणे अवघड आहे, असे सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

शहरात सलग दुसऱया दिवशी ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. त्यामुळे याचा परिणाम कोरोनाचा संसर्ग कमी होण्यावर होईल, अशी चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर राज्याचे साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “मार्चपासून कोरोनाचा फैलाव राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत आहे. एप्रिल-मेमध्ये राज्याच्या विविध भागांमधील तापमानाचा पारा चाळीश अंश सेल्सिअसपर्यंत वाढतो. त्याचमुळे त्यातून या विषाणूंचा फैलाव कमी होईल, यावरची चर्चा सुरू झाली होती.

पण, प्रत्यक्षात कोरोनाची पूर्ण माहिती समोर आलेली नाही. त्याचा आणि पर्यावरणाचा कोणता आणि कसा संबंध हे देखील स्पष्टपणे उलगडले नाही. कारण, युरोप आणि अमेरिकेत भारताच्या तुलनेत पूर्णपणे वेगळे वातावरण आहे. पण, तेथे तो वेगाने पसरताना दिसतो. भारतातही त्याच्या वाढीचा वेग कमी असला तरीही त्याचे अस्तित्व तो दाखवून देत आहे. त्यामुळे वातावरण आणि कोरोना विषाणू यांचा संबंध निटसा स्पष्ट झालेले नसल्याचे दिसते.”

पुण्यातही सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. वादळीवाऱ्यासह कोसळणाऱ्या या पावसाचा कोरोनाच्या फैलावार नेमका कसा परिणाम होईल, याचा अंदाज वर्तविणे अवघड आहे. कारण, हा विषाणू नवीन आहे. त्यावर संशोधन सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भूस्खलन, ७ जणांचा मृत्यू, २७ जण अडकले; मिथेन गॅसचा स्फोट, बचावकार्यात अडथळे

Cricketer Arrest: क्रिकेटविश्वात खळबळ! दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; हायकोर्टाचे तात्काळ अटकेचे आदेश

Live Updates Marathi : एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीला सुरुवात, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Samruddhi Accident: सोडण्यासाठी गेले, ते कायमचेच सोडून गेले! बहीण, आई-वडीलांचा मृत्यू, आता घरात तन्वी एकटीच

Lionel Messi: मेटलाइफ स्टेडियम मेस्सीसाठी दुर्दैवी; कोपा अमेरिकापाठोपाठ विश्वकरंडक स्पर्धेतही अपयश

SCROLL FOR NEXT