Hyperloop
Hyperloop 
पुणे

सर्वाधिक वेगवान हायपरलूप पॉड बनविल्याचा अभिमान; पुणेकर तन्मयने व्यक्त केली भावना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : माझे स्वप्नच प्रत्यक्षात उतरलंय! खरं तर, माझ्या ग्रॅड शाळेच्या अर्जामध्ये मी म्हटले होते, मला पॉवर इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा अभ्यास करायचा आहे. जेणेकरून हायपरलूपसारख्या भन्नाट गोष्टीवर काम करता येईल. आज हा नाटकीय बदल घडला असून, हायपरलूपमध्ये प्रवास करणारा मी पहिला भारतीय ठरलो आहे.

आज ज्यावर मी आरूढ होतो त्या सर्वाधिक वेगवान यंत्रणेच्या निर्मितीमध्ये माझे योगदान असल्याचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया व्हर्जिन हायपरलूप 'हाय स्पीड पॉड सिस्टिम'च्या पहिल्या मानवी चाचणीत सहभागी पुण्याच्या तन्मय मांजरेकरने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

अमेरिकेतील लास वेगास शहरात पार पडलेल्या चाचणीमध्ये एक अभियंता म्हणून तनय सहभागी झाला होता. व्हर्जिन हायपरलुपच्या पॉवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागात तनय 2016 पासून काम करत आहे. अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी ही टेस्ट राईड पार पडली. अमेरिकेतील मानवी चाचणी यशस्वी पार पडल्याने आता पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

आम्ही आता 'पेगासेसे फोर' :
जेव्हा प्रवाशाला पॉडमध्ये ठेवले जाते. तेंव्हा मोटरला ऊर्जा पुरविणाऱ्या व्हेरीएबल फ्रिक्वेन्सी ड्रायव्हरची सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचे काम माझ्याकडे होते. मानवी चाचणीच्या प्रत्येक टप्प्यावर माझा सहभाग आहे. आमच्या कंपनीतील प्रत्येकाला चाचणीत सहभागी होण्यासाठी अर्ज करायला सांगितले होते. बरेचसे प्रशिक्षण आणि चाचण्यांनंतर आम्हा चार जणांची निवड करण्यात आली आहे. आता आम्हाला सगळे लोक "पेगासेस फोर' म्हणून ओळखतात. 

चाचणीचा तपशील : 
सर्वाधिक वेग : सेकंदाला 47.96 मीटर 
चाचणीचा कालावधी : 15 सेकंद 
चाचणीचे अंतर : 396 मीटर 

हायपरलुपमुळे 1 कोटी 80 लाख नोकऱ्या : 
पुणे-मुंबई हायपरलुप प्रकल्पामुळे संपूर्ण कालावधीत 1 कोटी 80 लाख नोकऱ्या तयार होतील. त्यातील 16 हजार तात्पुरते आणि 1 लाख 28 हजार नोकऱ्या कायमस्वरूपी तयार होतील, असा दावा 'व्हर्जिन हायपरलुप वन'च्या इंडियन ऑपरेशनचे संचालक नौशाद ओमर यांनी सकाळशी बोलताना केला आहे. यामुळे महाराष्ट्रात आजवरची सर्वाधिक 36 अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक येईल असेही ते म्हणाले. 

माझं आजवरच आयुष्य पुण्यात गेले आहे. त्यामुळे मुंबई पुणे प्रवास तीस मिनिटाच्या आत होणे, हा किती क्रांतिकारक बदल असेल याची कल्पना मला आहे. हायपरलुपमुळे भारतासमोर अपरिमित संधीचे अवकाश खुले होईल. 
- तन्मय मांजरेकर, हायपरलुप राईड करणारा पहिला भारतीय 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT