Pune_Rain 
पुणे

हलका, मध्यम की मुसळधार पाऊस होणार? हवामान खात्याने काय वर्तवलाय अंदाज?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी (ता.२७) मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे जाहीर केले होते. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील तुरळक भागात मुसळधार पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. तसेच येत्या 1 जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे.

वेधशाळेच्या माहितीनुसार, येत्या दोन दिवस म्हणजेच सोमवार पर्यंत (ता.29) मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी मेघागर्जनेसह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर मंगळवारी (ता. 1) विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. दरम्यान या संपूर्ण आठवड्यात कोकण आणि गोव्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता 

पुणे शहर व परिसरात येत्या 3 जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तर रविवारी (ता.२८) शहर आणि परिसरातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम सरींचा पाऊस पडेल. तसेच यावेळी शहर आणि परिसरातील किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

हंगामातील एकूण पाऊस (1 जून पासून पुणे शहराचा) 
ठिकाण : एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये

पुणे : 153.1 मिमी
लोहगाव : 265.8 मिमी
पाषाण : 155.4 मिमी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT