Corona-Virus 
पुणे

Corona Effect : अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांचे 'वेट अँड वॉच'!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अमेरिकेमध्ये कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आले असले तेथे शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी सुरक्षीत आहेत. 15 एप्रिल नंतर स्थिती कशी असेल त्यावरच विद्यार्थी भारतात परतनार की तेथेच रहाणार हे स्पष्ट होईल.

कोरोनामुळे अमेरिकेत आत्तापर्यंत 93 जणांना मृत्यू झाला आहे. परिस्थीती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अमेरिकेत मोठ्याप्रमाणात निर्बंध घालण्यात आले असून, महाविद्यालये, विद्यापीठ, कंपन्या, हॉटेल्स यासह सर्व अस्थापना बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तेथील व्यवहार ठप्प आहेत.

पुण्यातून हजारो विद्यार्थी दरवर्षी अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी जातात, त्यामुळे तेथील विद्यार्थी स्वगृही परतणार की अमेरीकेत रहाणार असा प्रश्‍न पडला आहे. विद्यार्थ्यांचे महाविद्यालये बंद असले तरी सर्वांना घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेता येत आहे. तसेच नोकरी करणाऱ्यांनाही घरी बसून काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार घराबाहेर पडत नसल्याने सुरक्षीत आहेत.

दिलीप ओक ऍकेडमीचे दिलीप ओक म्हणाले, ''अमेरिकेत महाविद्यालये, विद्यापीठ बंद आहेत, त्यामुळे जे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत घरात बसूनच धडे घेत आहेत. बहुतांश विद्यार्थी हे स्वत: घरात जेवण बनवतात, त्यामुळे त्यांनी दोन महिन्यांसाठी लागणारे धान्य व जीवनावश्‍यक वस्तू भरून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे बाहेर पडता येत नसले तरी त्यांच्या जेवणाचा प्रश्‍न येणार नाही. 

तसेच 15 एप्रिल पर्यंत अमेरिकेतील स्थिती सुधारली नाही, तर हे विद्यार्थी परत येण्याची शक्‍यता आहे. स्थिती सुधारली तर परत येणार नाही. त्यामुळे आत्ताच विद्यार्थी येण्याची गडबड करत नसल्याचेही ओक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT