Home-Isolation 
पुणे

पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती डॉक्टरांच्या उपचाराविनाच स्वच्छेने होतात ‘होम आयसोलेशन’

सकाळवृत्तसेवा

पुणे - पॉझिटिव्ह आलेल्या अनेक व्यक्ती सध्या ‘होम आयसोलेशन’मध्ये राहत आहेत. त्यातील सुमारे १० टक्के रुग्ण हे कोणत्याही डॉक्टरांच्या उपचाराखाली नसतात. ते स्वच्छेने ‘होम आयसोलेशन’ करून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे अधिसूचना जारी होणे आवश्यक आहे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) करण्यात आली.

‘होम आयसोलेशन’ हे डॉक्टरांच्या उपचाराखाली आणि निरीक्षणानुसार करायचे असते. संबंधित रुग्णांची नोंद अधिकृतरीत्या डॉक्टरांनी महापालिकेच्या वेबसाइटवर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक रुग्णांना ‘होम आयसोलेशन’चे नियम माहीत नाहीत. यामध्ये आपल्या घरी स्वतंत्र खोली आणि त्याला जोडून स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृह असणे आवश्यक असते. केवळ खोली स्वतंत्र असून चालत नाही. अशी सोय नसल्यास ‘होम आयसोलेशन’ न करता रुग्णाला कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागेल. आज असे अनेक रुग्ण स्वतंत्र स्वच्छतागृह नसताना ‘होम आयसोलेशन’ची सुविधा घेत आहेत.

 इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘अनेक छोट्या कुटुंबामध्ये दोघेच जण असतात, दोघेही बाधित होतात. त्यांच्यापैकी एक गंभीर झाल्यास आणि दुसरा ‘होम आयसोलेशन’मध्ये असल्यास संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, त्याच्या औषधोपचाराची सोय करणे मुश्कील होऊन बसते. त्याबाबत काही विशेष सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.’

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री! रात्री उशिरा मुंबईकडे रवाना; प्रथमच महिलेकडे पद

काटेवाडी ते मंत्रालय... नेतृत्वासाठी तयार झालेलं व्यक्तिमत्त्व; सामाजिक कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक प्रवास

Mumbai Traffic: मुंबईत १ तारखेपासून नवीन वाहतूक नियम; दक्षिण भागात अधिक कठोर नियम, 'या' वाहनांना प्रवेश नाही

Budget 2026: बजेट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? ‘ब्लू शीट’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पडद्यामागची प्रक्रिया...

Pune Traffic : नवले पुलावर तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान लेन बंद; कात्रज जुना बोगदा आणि सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT