punit balan.jpg
punit balan.jpg 
पुणे

लोणीच्या शाळेसाठी बालन फौंडेशन देणार दोन कोटी

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : ""इंद्राणी बालन फौंडेशनच्या वतीने लोणी परिसरात दहा एकर जागेची उपलब्धता झाल्यानंतर सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अॅकॅडमी उभारण्यात येईल. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल लोणी गावाचा नावलौकिक राज्यात नव्हे संपूर्ण देशात वाढविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न केला जाईल, अशी माहिती इंद्राणी बालन फौंडेशनचे अध्यक्ष उद्योजक पुनीत बालन यांनी दिली.'' 

लोणी (ता. आंबेगाव)  येथील भैरवनाथ विद्याधाम प्रशालेच्या प्रांगणात माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या कामासाठी इंद्राणी बालन फौंडेशनच्या वतीने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्या कामाचे भूमीपूजन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन पुनीत बालन व आर. एम. धारिवाल फौंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी बालन बोलत होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रसंगी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळूंज, इंद्राणी बालन फौंडेशनचे सदस्य चेतन लोखंडे, प्रबोधिनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, वस्तू व सेवाकर उपायुक्त अरिफ मुलाणी, सेवानिवृत्त कृषी उपसंचालक प्रकाश सोनवणे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लांबहाते, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, संतोष पडवळ, उपसरपंच राणी गायकवाड, पोलिस पाटील संदीप आढाव, प्राचार्य गोरक्षनाथ दळवी, सावळेराम नाईक, दिलीप वाळूंज, सोमनाथ कदम, उद्योजक राजेश वाळूंज, ग्रंथमित्र रमेश सुतार, अशोक आदक पाटील, सुरेश वाळूंज, पांडुरंग वाळूंज, संजय सिनलकर, प्रकाश वाळूंज उपस्थित होते. 

पुनीत बालन म्हणाले, ""सामाजिक कामात कधीही राजकारण येता कामा नये. इंद्राणी बालन फौंडेशनच्या माध्यमातून सातारा जिल्हा परिसरात सहा हजार गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप केले आहे. तेवढ्याच संख्येने शाळांना संगणक वाटप केले आहे. 1084 शाळांत पुस्तकपेढी स्थापन केली आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलिस, आरोग्य कर्मचारी, वर्तमान पत्र वितरक त्याचबरोबर हजारो गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. शाळेच्या इमारतीचे काम वर्षभरात पूर्ण केले जाईल. मी शहरात राहतो पण काम ग्रामीण भागात करतो. खेड्यांच्या विकासासाठी झटतो याचा अर्थ मी मागच्या जन्मी शेतकरी कुटुंबात जन्मलो असेल.'' 
जान्हवी धारिवाल म्हणाल्या, ""इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरात 10 हजार वृक्षांची लागवड करण्यात येईल.'' 

कैलास गायकवाड म्हणाले, ""माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या सहकार्यातून एक कोटी रुपये खर्च करून पहिल्या मजल्याचे काम पूर्ण केले आहे. आर्थिक कमतरता भासू लागल्यानंतर चेतन लोखंडे यांच्या माध्यमातून पुनीत बालन यांची भेट झाली आणि त्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे काम मार्गी लागले.'' प्रास्ताविक मयूर लोखंडे यांनी केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, सरपंच ऊर्मिला धुमाळ, माजी सरपंच उद्धवराव लंके यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात शाळेच्या प्रस्तावित प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यासाठी दहा लाख रुपयांचा धनादेश प्रबोधिनीकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते तानाजी राजगुडे यांनी शाळेसाठी एक लाख रुपयांचा धनादेश यावेळी दिला. सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळूंज यांनी केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT