Savitribai_Phule_Pune_University 
पुणे

अखेर बढतीचा मार्ग मोकळा; प्राध्यापकांच्या मुलाखती मंगळवारपासून!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयामधील सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी "सेवांतर्गत प्रगती योजनेतून' (करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम- कॅस) 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना ठराविक कालावधीनंतर पदोन्नतीसाठी "कॅस' मुलाखतींना सामोरे जावे लागते. त्यासाठी ओरिएंटेशन कोर्स, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, रिफ्रेशर कोर्ससह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंधही सादर झालेले असणे आवश्‍यक आहे. ही सर्व माहिती "कॅस'च्या मुलाखतींसाठी महत्त्वाची ठरते. यापूर्वी पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांसाठी मार्च 2020 मध्ये मुलाखतींचे घेण्याचे ठरवले होते. पण कोरोनाची साथ सुरू झाल्याने मुलाखती स्थगित केल्या. त्यानंतर सप्टेंबरमध्ये मुलाखती होणार होत्या, पण अंतिम वर्षाच्या परीक्षांचे काम आणि लॉकडाऊनमुळे प्रवासावरील बंधने यामुळे प्राध्यापकांनी विरोध केल्याने त्या पुन्हा एकदा स्थगित केल्या.

विद्यापीठाने अंतिम वर्ष व अंतिम पूर्व बॅकलॉग परीक्षांचा ताण संपल्यानंतर रखडलेल्या "कॅस'च्या मुलाखती 22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत घेण्याचे निश्‍चित केले आहे. यामध्ये 484 प्राध्यापकांचा समावेश आहे. नोंदणी केलेल्या सहयोगी प्राध्यापकांनी त्यांना ठरवून दिलेल्या तारखेला व वेळेत मूळ सेवा पुस्तक, यापूर्वी कॅस अंतर्गत वेतन निश्‍चितीचे पत्र, शैक्षणिक पात्रतेची मूळ कागदपत्र, विद्यीपाठ मान्यता पत्र, स्वतःची व प्राचार्यांची स्वाक्षरी असलेली चेकलिस्ट फॉर्म याच्या चार फाइल तयार करून सोबत घेऊन यावेत, असे शैक्षणिक विभागाने आदेशात नमूद केले आहे.

प्रत्येक महिन्याला मुलाखतीची आदेश
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) "कॅस' मुलाखतीच्या कामात सुधारणा करण्याची सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने जुलै 2019 मध्ये आदेश काढला, त्यानंतर उच्च शिक्षण पुणे सहसंचालक कार्यालयाने 12 डिसेंबर 2020 ला पुणे विद्यापीठाने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात "कॅस'च्या मुलाखती घ्याव्यात असे आदेश दिले आहे. पुणे विद्यापीठात वर्षातून एकदाच मुलाखती होत असल्याने प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या लाभाचा आणि आर्थिक लाभ याचे नुकसान होत असल्याने शासनाच्या आदेशाप्रमाणे मुलाखती घ्याव्यात अशी मागणी यापूर्वी प्राध्यापक संघटनांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT