ISO rating of six police stations in circle five in Pune 
पुणे

पुण्यातील एकाच परिसरातील सहा पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर पोलिस दलाच्या पुर्नरचनेमध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या परिमंडळ पाच या एकाच परिमंडळातील सहा पोलिस ठाण्यांसह सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयास स्मार्ट व "आयएसओ 9001 ः2015' मानांकन प्राप्त झाले आहे. पोलिस ठाणे व सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयात झालेल्या कायापालटामुळे हे मानांकन प्राप्त झाले आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी पुणे पोलिस दलाच्या प्रशासकीय कामाची पुर्नरचना केली. त्यामध्ये फातिमानगर येथे परिमंडळ पाचच्या कार्यालयाची निर्मिती करुन स्थानिक नागरीकांची गैरसोय टाळण्यात आली. पहिल्यांदाच स्थापन झालेल्या या परिमंडळाच्या पोलिस उपायुक्त म्हणून प्रकाश गायकवाड यांनी कार्यभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी दैनंदिन पोलिस ठाणी, सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयांना भेटी देऊन तेथील अडचणी व त्रुटी शोधून पोलिस ठाण्यांचा कायपालट करण्यास प्राधान्य दिले. त्याची "आयएसओ'कडून दखल घेत मानांकन देण्यात आले. गायकवाड सध्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

..यामुळे मिळाले मानांकन ! 
पोलिस कर्मचाऱ्यांना टापटीप व एकसारखा पोशाख, पोलिस ठाण्यांची रंगरंगोटी, व्यवस्थितपणा, तक्रारदारांसाठी स्वतंत्र स्वागत कक्ष, तक्रारदारांना सन्मानपुर्वक वागणुक, अभिलेखाछी वर्षनिहाय मांडणी, निर्लेखन, गुन्हे व मुद्देमाल निर्गती, गुन्ह्याच्या ठिकाणी विनाविलंब भेट, तत्काळ तपास व कारवाई, अभ्यागतांसाठी प्रतिसाद व्यवस्था या स्वरुपाचे महत्वपुर्ण बदल करण्यात आले. या सर्व मुद्यांची पडताळणी करुन परिमंडळ पाचमधील बिबवेवाडी, मार्केटयार्ड, मुंढवा, कोंढवा, हडपसर, वानवडी व सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयास स्मार्ट व "आयएसओ 9001 ः2015' मानांकन देण्यात आले. 

CAA : हाजी नसते, तर मी वाचलो नसतो; जमावाच्या तावडीत सापडलेल्या पोलिसाचा अनुभव

"परिमंडळ पाच हे नव्यानेच निर्माण करण्यात आले होते. परिमंडळाच्या उपायुक्त पदाची जबाबदारी पहिल्यांदा माझ्याकडे आली. त्यानंतर पोलिस ठाण्यांना नियमीत भेट देऊन कामातील महत्वाचे बदल, अंतर्बाह्य सुधारणा, नागरीकांशी सुसंवाद व नीटनेटकेपणावर भर दिला. या सगळ्याची दखल घेऊनच पाच परिमंडळातील सहा पोलिस ठाणे व सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयालयास मानांकन मिळाले. त्याचा आनंद वाटतो.'' प्रकाश गायकवाड, पोलिस अधिक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT