ॲड.मारुती गोळे
ॲड.मारुती गोळे sakal
पुणे

अकराशे किलोमीटर पायी जिंजी ते सिंहगड 'गरुडभरारी मोहीमे'ची सांगता

राजेंद्रकृष्ण कापसे : सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : आग्रावीर ॲड.मारुती गोळे यांच्या पायी जिंजी ते सिंहगड अशी अकराशे किलोमीटरची गरुडभरारी मोहीमेची सांगता झाली. ‘रक्तदाब, मधुमेह मुक्त भारत’ याचा प्रचार त्यांनी यामोहिमेतून केला. त्यांच्यासोबत सागर थरकुडे, विक्रम पवार सोबत होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असल्याने १३५ कोटी भारतीयांना ही मोहीम त्यांनी अर्पण केली.

सिंहगडावर खेडशिवापूर कल्याण मार्गे आले. शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता त्यांनी कल्याण दरवाज्यात पोचले. तेथे मित्र परिवाराच्या वतीने डॉ.नंदकिशोर मते, ॲड.प्रकाश केदारी, यांनी हार घालून आणि पेढा भरवून स्वागत केले. श्रीअमृतेश्वर मंदिर, नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी व श्री कोंढाणश्वर मंदिर येथे नतमस्तक झाले. त्या नंतर ते सिंहगडावरील छत्रपती राजारामांच्या समाधीला अभिषेक घातला. जिंजी(तामिळनाडू) येथून आणलेल्या पाण्याने सिंहगडावरील छत्रपती राजारामांच्या समाधीला अभिषेक घातला.

तेथून आणलेल्या मातीत समाधीसमोर झाड लावले. त्यानंतर, गरुड मोहिमेची सांगता शुक्रवारी रात्री झाली. मोहिमेची सांगता करताना ॲड.मारुती गोळे म्हणाले, देशात दहा पैकी दोन जणांना रक्तदाब किंवा मधुमेह आहे. भविष्यात हि संख्या वाढेल. घरातील एकजण आजारी पडला तर पूर्ण कुटुंब आजारी होते. सर्व कुटुंब आजारी असेल आर्थिक हानी होते. दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी दागिने, जमीन विकावे लागते. म्हणून घरातील प्रत्येकाने रोज किमान ४५ मिनिटे व्यायाम केला पाहिजे. तर देश रक्तदाब, मधुमेह मुक्त भारत होईल. असा संदेश त्यांनी या मोहिमेतून गोळे यांनी दिला.

छत्रपती शिवरायांनी आग्रा ते राजगड प्रवास स्वराज्यासाठी केला. तर छत्रपती शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्य रक्षणासाठी जिंजी ते सिंहगड प्रवास केला. दोन्ही प्रवास औरंगजेबाच्या कचाट्यातून सुटण्यासाठीचे होते. तसेच या पिता- पुत्रांनी केलेला दक्षिण दिग्विजय देखील हिंदूस्थानसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती राजाराम महाराज जिंजीहून सिंहगडला आले. त्या घटनेचे यंदा ३२४ वे वर्ष आहे. गोळे यांची आग्रा ते राजगड हि मोहिम दोन वेळा झाली आहे. म्हणून जिंजी ते सिंहगड पायी गरुडभरारी मोहीम पूर्ण करण्याची खूणगाठ त्यांनी बांधली होती.

छत्रपती शिवरायांचा दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाचा जागर करणे. निरोगी आरोग्याचा, पर्यावरण रक्षणाचा, गडकोट संवर्धनाचा संदेश देखील त्यांनी यावेळी दिला. कोल्हापूरला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व तंजावर येथे श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर, २६ डिंसेबर २०२१ रोजी जिंजी किल्ल्यातून मोहिमेची सुरूवात झाली. दररोज सुमारे ४० किलोमीटरचा पायी प्रवास करीत २७ दिवसात अकराशे किलोमीटर अंतर पूर्ण केले. जिंजीपासून महाराष्ट्रात प्रवेश करेपर्यंत प्रत्येक मुक्कामाला स्थानिक मराठी बांधव मदतीला होते. त्यांच्या सहकार्याने ती मोहीम पार पडली. सागर थरकुडे हे पैलवान आहेत. तर विक्रम पवार सॉफ्टवेअरमध्ये काम करतात.

अश्रू अनावर…

मोहिमेला जिंजी किल्ल्यातून सुरुवात केली. आणि अवघे १२ किलोमीटर अंतर पार केले. चुलत्यांचे निधन झाल्याचे मोठ्या भावाने सांगितले. माझ्या मनावर दडपण आले. त्यांचा शेवटचा कोणताही विधी सापडणार नव्हता. अखेर सरनोबतांचा वारसा जपणे. म्हणजे मोहिम पूर्ण करणे हिच खरी चुलत्यांना श्रद्धांजली होती. त्यानंतर आठ दिवसांनी सतत पाठीशी असणारा मोठा भाऊ पोपटचा हात फॅक्चर झाला. यादोन्ही घटनेने अतिशय द्विधा मनस्थिती झाली होती. असे सांगताना गोळे भावनावश झाले होते.

सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान, वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन, सिंहगडचे अभ्यासक डॉ.नंदकिशोर मते, तसेच १५७ गावातील गोळे परिवार आणि माझा सर्व मित्र परिवार यांच्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली. यापुढे देखील माझ्या विविध मोहिमा अशा प्रकारे सुरू राहील असे त्यांनी सांगितले.

पत्नी स्वाती, मेघराज, मैत्रेई, पार्थ ही मुले, पुष्पावहिनी, सासरे श्रीहरी मारणे, मुळशी तालुका कब्बडी संघाचे अध्यक्ष सागर गोळे, देविदास गोळे, स्वप्नील गोळे, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रेय जोरकर, ॲड.प्रकाश केदारी, मंदार मते, महेश मालुसरे, माजी उपसरपंच अमोल पढेर, नितीन गोळे यासह गोळे परिवार स्वागताला उपस्थित होते.

ध्येयवेडे ॲड.मारुती गोळे

-स्वराज्यातील पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजीराव गोळेंचे १४वे वंशज.

-मारूती गोळे १० वर्षापासून विविध साहसी मोहिमा करतात

-भारत, जगातील सुमारे ११६२ किल्यांवर पोचलेत. (डोंगरावरील किल्ल्यावर पायी जातात.)

-२०१७ एकट्याने आग्रा ते राजगड हा १२५३ किलोमिटर पायी प्रवास

-२०२१ आग्रा ते राजगड, १३ दिवसात ३० सहकाऱ्यांसोबत शिवज्योत धावत आणली.

मोहिमेतील रोजची दिनचर्या

-सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत किमान २० किलोमीटर चालणे.

-त्यानंतर स्वयंपाक, जेवण, कपडे धुणे, थोडासा आराम

-दुपारी ४ ते १० वाजेपर्यंत २० ते २२ किलोमीटर चालणे.

-चांगली जागा पाहून रात्रीचे जेवण आणि तंबूत मुक्काम

-स्थानिक शिवभक्तांनी जेवण नास्ता दिला

- रोज शाकाहारी आहार

-इडली/भात किंवा उपीट, अर्धा लिटर दूध खाऊन वाटचाल

-दुपारी दाल राईस, घरचे डिंक लाडू

-सोबत गॅस सिलेंडर व कार होती

-चालल्याने पायाला फोड आले होते, गरम पाण्यात पाय शेकले

गरुड मोहिमेबाबत मान्यवरांच्या प्रतिक्रिया

डॉ.नंदकिशोर मते (सिंहगडचे संशोधक)

सरनौबत पिलाजीराव गोळे यांनी छत्रपतींच्या चार पिढ्यांना साथ दिली. छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले. त्यावेळी प्रतापगडाच्या लढाईत सरदार पिलाजीराव गोळे यांनी मोठी कामगिरी केली. छत्रपती राजारामांचे प्राण वाचवले होते. या मोहिमेमुळे इतिहास पुन्हा उजेडात आला. घराण्याचा असा इतिहास माहिती झाल्यानंतर गोळे कुटुंबातील या तरुणाच्या मनात शिवप्रेमाची ठिणगी पडली आणि त्यांनी स्वराज्यातील इतिहासाला वाहून घेतलं. आग्रा ते राजगड मोहीमेपूर्वी खडकवासला ग्रामस्थ, सिंहगड पावित्र मोहिमेच्या वतीने आम्ही पहिला सत्कार केला होता. त्यांची नक्षलवादी परिसरातील सुरगड मोहीम देखील खूप आगळी वेगळी झाली. अशा मोहिमा करण्यासाठी रग, जिद्द आणि काळजात शिवप्रेम असावे लागते. आग्रा ते राजगड मोहीम पूर्ण करताना या आजच्या मोहिम करण्यासंदर्भात चर्चा झाली होती.

राहुल नलावडे (लेखक) -

छत्रपती शिवरायांचा इतिहास मनात सकारात्मकता रुजविते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वावर छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्य सांभाळले. शिवचरित्र रक्ताच्या नसानसात भिनावे लागते. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना समजले ते गोळे यांच्यासारखे मानबिंदू होतात. मोहिमेची सांगता हा सुवर्णक्षण आहे. इतिहास घडवणारे मारुती गोळे यांच्या सोबत आम्ही सिंहगडावर उपस्थित होतो. हि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

दिग्विजय जेधे (संस्थापक, वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन)-

आग्रा मोहीम पूर्ण केल्यावर आम्ही त्यांना आग्रावीर पदवी दिली. जिंजी ते सिंहगड मोहीम केल्यामुळे आता जिंजीवीर पदवी ॲड.मारुती गोळे, सागर थरकुडे, विक्रम पवार या तिघांना आम्ही देत आहोत. दोन्ही मोहिमा पूर्ण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला मारुती गोळे यांनी अनोखी पद्धतीने मानवंदना दिली. पूर्ण मॅरेथॉन ४२ किलोमीटरची असते. ॲड.गोळे यांनी सलग सत्तावीस दिवस रोज एक पूर्ण मॅरेथॉन केली. त्यामुळे, अल्ट्रा मॅरेथॉन करणाऱ्या खेळाडूंसाठी मारुती गोळे यांची ही मोहीम मार्गदर्शक व दिशादर्शक आहे.

अनिल पवार ( सदस्य, देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन ) -

ॲड.गोळे यांची मानसिक इच्छाशक्ती फार मोठ्या प्रमाणावर आहे. आग्रा ते राजगड प्रवास एकट्याने केला. त्याचवेळी, जिंजी सिंहगड मोहिमेची बीजे रोवली गेली होती. मोहिम करताना अनेक अडचणी येतात. यंदा कोरोनाची तिसरी लाट, थंडी, पाऊस असे बदलते वातावरण होते. त्यामुळे हि मोहिम लवकर पूर्ण व्हावी. अशी सर्वांची इच्छा होती. निरोगी आयुष्य देशातील नागरिकाला लाभले पाहिजे. असा विचार करणे ही मोठी गौरवास्पद बाब आहे. गोळे यांच्या पत्नी, भाऊ, मुले त्यांच्या पाठीशी असल्याशिवाय अशा मोहिमा पूर्ण होऊ शकत नाही.

राजेंद्र टिपरे(सदस्य, दुर्ग संवर्धन समिती)-

मारुती गोळे यांचे आतापर्यंतचे कार्य प्रेरणादायी असून त्या व्यक्तिमत्वाला माझा मानाचा मुजरा. त्यांच्या कार्यात कुटुंबाचा पाठींबा खूप महत्वाचा आहे.

विश्वनाथ मुजुमले (अध्यक्ष,नरवीर तानाजी मालुसरे प्रतिष्ठान)-

जिंजी ते सिंहगड या गरुडभरारी मोहिमेमुळे सिंहगडावरील हि भूमी पवित्र झाली. छत्रपती राजाराम महाराजांनी मोठ्या कष्टाने मराठ्यांची ही कारकीर्द सांभाळली. हि मोहिम तरुणांना प्रेरणा देणारी आहे. म्हणून आम्ही गोळे यांना सिंह वीर पदवी देत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT