corona 
पुणे

जुन्नरमध्ये सात दिवसांतच कोरोनाबाधितांचा आकडा पोचला..

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील अकरा गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 20 रुग्ण आढळले असून, त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर एक रुग्ण बरा झाला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात कोरोनाचे 18 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथे २ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. उपचारानंतर हा रुग्ण बरा झाला. त्यानंतर जवळपास गेले दोन महिने तालुका कोरोनामुक्त होता. मात्र, मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक नागरिकांनी जुन्नरला आपापल्या गावी धाव घेतली. त्यानंतर धोलवड येथे कोरोनाचा दुसरा रुग्ण 23 मे रोजी आढळून आला. तेव्हापासून गेल्या सात दिवसांत तालुक्यात कोरोनाचे 19 रुग्ण आढळले. यातील बहुतेक रुग्ण मुबंई येथून आलेले आहेत. दरम्यान, औरंगपूर येथील रुग्णाचे उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 28) निधन झाले आहे. उर्वरीत अठरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जुन्नर तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या १३ हजार १७२ जणांना २९ मेअखेर क्वारंटाइन करण्यात आले असून, यात होम क्वारंटाइन १२ हजार ४५३, तर संस्थात्मक क्वारंटाइन  ७१९ इतके आहेत. कोरोना संशयित १९८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहे. यापैकी १५३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, यात १९ पॉझिटिव्ह, तर १३४ निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून, ४५ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांनी गावात फिरू नये. मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, वारंवार हात साबणाने धुवावेत, सोशल डिस्टन्स पाळावे, कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, शक्यतो घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जुन्नर तालुक्यातील गावनिहाय कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : सावरगाव- ५, धोलवड- ३, मांजरवाडी- २, पारुंडे- २, आंबेगव्हाण- २, खिलारवाडी- १, धालेवाडीतर्फे मिन्हेर- १, विठ्ठलवाडी- १, शिरोलीतर्फे आळे- १. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT