khadki cantonment will becoming the ideal vegetable market pattern 
पुणे

खडकी कॅन्टोन्मेंट भाजी मंडई पॅटर्न ठरतोय आदर्श

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार(पुणे): कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शुक्रवार (ता.१०) पासून पुणे शहरातील सर्व भाजी मंडई बंद करण्याचा निर्णय शासनातर्फे घेण्यात आला. मात्र, याला अपवाद खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची भाजी मंडई ठरत आहे. मध्यवस्तीतून वस्तीच्या बाहेर बोर्डाने भाजी मंडई  नेऊन सर्व नियम पाळून कोरोना संदर्भात काळजी घेऊन एक वेगळा प्रयोग निर्माण केला आहे. पुणे शहरात खडकी भाजी मंडई पॅटर्न आदर्श ठरत असल्याची चर्चा सध्या वाऱ्यासारखी पसरत आहे.    
     
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप



ती'च्या करिता मातोश्री'वरून सूत्रे हलली अन्'
पुणे मुंबई मार्गावर एसीपी कार्यालय शेजारी असलेल्या भल्या मोठ्या पटांगणात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने सर्व सुविधायुक्त मंडई सुरू केली आहे. यासाठी मंडईत गर्दी होऊ नये याकरिता सुमारे ६२ पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले असून एका वेळी दहा ते पंधरा व्यक्तींनाच मंडईत दहा मिनिटं प्रमाणे भाजी खरेदीसाठी वेळ देण्यात येत आहे. चारही बाजूने परिसर बंद करण्यात आला असून फक्त एकच प्रवेश मार्ग ठेवण्यात आला आहे. प्रवेश करताना नागरिकांना सायनिटायजेशन करून मग आत प्रवेश दिला जातो आत गेल्यानंतर ही बोर्डाचे कर्मचारी ग्राहकाला हात धुवायला लावत असून प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचा नाव व दूरध्वनी क्रमांक वहीत टिपून घेत आहे.

Lockdown : 'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू 
बोर्डातर्फे परिसरात पूर्ण देखभाल ठेवण्यात येत आहे. याठिकाणी भाजी खरेदीसाठी पहिल्या दिवशी सुमारे दोन किलोमीटर पर्यंत नागरिकांनी रांग लावल्याचे दिसून आले अतिशय सुरेख पद्धतीने या ठिकाणी कार्य सुरू असून नागरीक ही या ठिकाणी प्रतिसाद देताना आढळून आले. यासाठी बोर्डाचे सीईओ प्रमोदकुमार सिंह, उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, सदस्य मनीष आनंद, सदस्या पूजा आनंद त्याचबरोबर बोर्डाचे आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी व अग्निशामक दलाचे जवान यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात कदाचित अशी आदर्श मंडई पहावयास मिळणार नाही अशी प्रतिक्रिया येथे भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिक देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : पायाभूत प्रकल्प तातडीने मार्गी लावा - मुख्यमंत्री

Raj Thackeray Angry Reaction: ‘’निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद पाहून, तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता...’’

Leopard Conflict : मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी चार तासांत ११.२५ कोटींचा निधी मंजूर!

माझ्या माघारी मुलाला कोण सांभाळेल... मराठी अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटाचा काळ; म्हणाली, 'रात्रभर झोप... '

SCROLL FOR NEXT