Crime_Pune 
पुणे

कोथरुडमध्ये घडला किळसवाणा प्रकार; मालकाने मॅनेजरच्या गुप्तांगात मारला सॅनिटायझर स्प्रे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊनमध्ये दिल्लीत अडकल्यानंतर कंपनीच्या खर्च केलेल्या पैशांची मागणी करीत कंपनीच्या मालकाने व्यवस्थापकास जबर मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्याने व्यवस्थापकाच्या गुप्तांगावर सैनिटायझर स्प्रे करत त्याला जखमी केलं. हा किळसवाणा प्रकार करणाऱ्या कंपनीच्या मालकला अखेर कोथरुड पोलिसांनी गुरुवारी (ता.९) मध्यरात्री अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

गणेश रामराव केंजळे असे अटक केलेल्या मुख्य संशयित आरोपीचे नाव आहे. तर त्याचा ड्रायव्हर वैभव साबळे, कर्मचारी सागर शिंदे हे दोघे फरारी आहेत. याप्रकरणी एका ३० वर्षीय तरुणाने कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तपास अधिकारी अनिल लवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोथरुडमधील पुणे आर्ट फेस्टिव्हल नावाच्या कंपनीमध्ये पाच महिन्यांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मार्च महिन्यात ते कार्यालयीन कामासाठी दिल्ली येथे गेले असताना लॉकडाऊनमुळे ते दिल्लीत अडकले. त्यांच्याजवळचे पैसे संपल्यानंतर दिल्लीत राहण्यासाठी त्यांनी कंपनीचा मालक केंजळे याच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा केंजळे याने पैसे देण्यास नकार दिला.

दरम्यान, फिर्यादीने हॉटेलचे बील देता न आल्याने तेथे कंपनीचा लॅपटॉप तारण ठेवला. तसेच पुण्यात आल्यानंतरही त्यांना हॉटेलमध्ये राहावे लागल्याने त्यांनी तेथेही कंपनीचा मोबाईल आणि क्रेडिट कार्ड तारण ठेवले. दरम्यान, १३ जून रोजी फिर्यादी हे त्यांच्या मित्रासमवेत घोटावडे फाटा येथे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी कंपनीचा मालक गणेश केंजळे, त्याचा ड्रायव्हर वैभव साबळे यांनी फिर्यादीस कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांच्या कार्यालयात नेले.

तेथे केंजळे, सागर शिंदे यांनी फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच चिखलाने माखलेले पाय धुण्यास सांगून तेच पाणी पिण्यास भाग पाडले. तर साबळेने फिर्यादीच्या स्प्रेद्वारे गुप्तांगावर सॅनीटायझर मारले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी यांनी स्वत:ची सुटका करुन घेत पोलिस ठाणे गाठले. तेथे फिर्याद दाखल केली. फिर्यादी या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, तपास अधिकारी लवटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गणेश केंजळे याला गुरुवारी रात्री अटक केली. तर साबळे आणि शिंदे या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT