plasma-therapy 
पुणे

जु्न्नरकरांसाठी लेण्याद्रीचे कोविड सेंटर ठरलय वरदान

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र लेण्याद्री येथील कोविड सेंटर कोरोनाच्या रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. या केंद्रामुळे तालुक्यातील कोरोनाच्या संशयित रुग्णांना स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे जाण्याचा त्रास वाचला आहे. त्यातून सरकारच्या खर्चात मोठी बचत होण्यास मदत झाली आहे. 

जुन्नर तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून हे केंद्र सुरू झाले. यासाठी लेण्याद्री देवस्थान ट्रस्टने आपले भव्य असे यात्री निवास उपलब्ध करून दिले. त्यामुळे येथे शंभर खाटांचे कोविड केंद्र २३ मेपासून कार्यरत झाले आहे. 

या केंद्रात गेल्या बारा दिवसांत एकूण १३८ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. या काळात १२४ रुग्णांचे स्वॅब घेऊन ते पुणे येथे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी आठ जणांचे अहवाल येणे बाकी असून, ११६ पैकी १०६ निगेटिव्ह, तर १० जणांचे पॉझिटिव्ह अहवाल आले असल्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे व केंद्रप्रमुख डॉ. श्याम बनकर यांनी सांगितले.

महसूल व आरोग्य विभाग तसेच नगर पालिका येथील अधिकारी व कर्मचारी या केंद्राचे व्यवस्थापन पाहत असून, सद्या येथे दहा रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत शिंदे यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लेण्याद्री येथील कोविड सेंटर सुरू होण्यापूर्वी एका संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून त्यास पुणे येथे पाठविण्यात येत असे. यासाठी सरकारचा सात ते आठ हजार रुपये खर्च होत असे. संबंधित रुग्णांचे दोन ते तीन दिवस यात जात असत. त्यास मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागत असे.

या केंद्रांमुळे रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यास मदत झाली असल्याचे निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

SCROLL FOR NEXT