पुणे

पुण्यातील मुंढव्यात दोन ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना; लाखोंचे नुकसान

पांडुरंग सरोदे

पुणे : मुंढवा येथे शनिवारी मध्यरात्री एका फर्नीचरच्या दुकानाला आग लागली. त्यानंतर अवघ्या दोन तासातच मुंढव्यातीलच एका कार शोरुमला आग लागल्याची घटना घडली. दोन्ही ठिकाणी अग्निशामक दलाने तत्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. 

मुंढवा येथील स्मशानभूमीजवळ मोठे फर्नीचरचे दुकान आहे. शहरातील विविध मॉलमध्ये असणारे फर्नीचर संबंधित गोडाऊनमध्ये ठेवण्यात येते. गोडाऊनला शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता आग लागली. आगीची वर्दी मिळताच 5 बंब व 3 पाण्याचे टैंकर घटनास्थळी दाखल झाले. फर्निचर असल्याने आग विझविन्यात अडचण येत होती, त्यामुळे जेसीबी मशीन बोलावून फर्निचर बाजूला करुन आग विझविली. फोम, प्लायवूड, कापड, काचा यामुळे आग वाढली होती. 

दरम्यान, पहाटे अडीच वाजता मुंढवा पोलिस चौकीजवळ असलेल्या महालक्ष्मी मारुती सुझुकी सेंटर शोरुम या दुकानाला आग लागली. 40 हजार स्क्वेयर फुट पैकी 20 हजार स्क्वेअर फुट जागेत आग लागली होती. आगीमध्ये 5 ते 6 कार जळाल्या. तसेच शोरूमचे बांधकाम, फर्नीचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे, विभागीय अधिकारी रमेश गांगड, केंद्र अधिकारी विजय भिलारे व केंद्र अधिकारी प्रकाश गोरे यांच्यासह असंख्य जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे काम केले.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: CSK विरुद्ध काय प्लॅन केला होता? सूर्यवंशीचा खुलासा; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला, 'केक लावतील म्हणून...'

'माझ्या भावाने मला 'घंटागाडी'....' ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीला घरी काय नावाने हाक मारतात? अभिनेत्री म्हणाली...

Latest Marathi News Live Update : विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

SCROLL FOR NEXT