add-k.jpg 
पुणे

पुणे : वकीलबाबूंच्या कामाची गावातच नव्हे तर, जिल्हाभर चर्चा

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवांना परवानगी असली तरी कोरोनाच्या भीतीने अनेक सेवा पुरवठादार आपली सेवा पुरवीत नसल्याने, नागरिकांची गैरसोय होत होती . या पार्श्वभूमीवर मोहाट (ता .जावळी ) येथील पिठाची गिरणी चालू ठेवण्यासाठी  येथील पेशाने वकील असलेल्या 
अॅड. अनिल देशमुख यांनी महिनाभर गावकऱ्यांना स्वतः  पीठ दळून देऊन, भात कांडणी करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या सेवेबद्दल पुण्यातील जावळी तालुका मित्र मंडळ आणि शिवप्रदेश प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या कामाची जिल्हाभर चर्चा सुरु आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे  जावळीत पहिला करोनाचा रुग्ण निझरे येथे सापडला.त्यानंतर तालुक्यातील बहुतेक सर्व व्यवहार ,कामकाज ठप्प झाले. 

लॉकडाउन असल्याने या भागातील अनेक व्यवहार बंद झाले. यातच येथील काही पिठाच्या गिरण्या , भात कांडप मशीन देखील  बंद राहिल्याने नागरिकांना पीठ दळून मिळणे, भाताचे तांदूळ करून मिळणे अवघड होणार होते . नागरिकांची गैरसोय पाहता मूळचे मोहाट  येथील रहिवासी असलेले साताऱ्यातील  ॲडव्होकेट अनिल देशमुख यांनी घरची  गिरणी स्वतः चालू करून आपल्या पदाचा, व्यवसायाचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता सेवा दिल्याने नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. लॉकडाऊन काळात रोज ४ ते ५ तास गिरणी चालवून तसेच गिरणीबरोबर शेतीची कामे करून सर्वांपुढे आदर्श ठेवला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

जावळी परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्याने अत्यावश्यक सेवांनादेखील निर्बंध  आले होते . एकामागोमाग एक  करोनाचा संसर्ग झाल्याने अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या अनेकांनी आपले व्यवसाय स्वतःहून बंद ठेवले. या भागात असणाऱ्या  काही पिठाच्या गिरण्यादेखील बंद राहिल्या. त्यामुळे नागरिकांना आपले दळण दळण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती.

दरम्यान अनिल यांची वडिलोपार्जित पिठाची गिरणी आहे.अनिल यांच्या मातोश्री  कांताबाई शंकर देशमुख यांनीही गिरणी चालवून गावकऱ्यांना दिलासा दिला.मोहाट पंचक्रोशीतील ही पहिली गिरणी असून १९६० च्या दशकापासून अविरत सेवा देत आहे. देशमुख यांचे आजोबा संपतराव धनावडे पाटील यांनी भाताच्या पिकाचे उच्च्यांकी उत्पादन घेतल्याबाबत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यांना प्रगतिशील शेतकरी म्हणून गौरविले गेले होते. या सर्व पार्श्वभूमीवर अनिल  आणि त्यांच्या मातोश्री कांताबाई शंकर देशमुख यांच्या सेवेचे जावळीत कौतुक होत आहे.     

जिल्हा प्रवास बंदी उठल्यावर त्यांचा सत्कार पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवप्रदेश प्रतिष्ठानच्या वतीने जब्बार पठाण ,राजू नलवडे,संजय शेलार ,विनोद पार्टे यांनी पुढाकार घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT