Lockdown 
पुणे

'लॉकडाउन'चा मुक्काम अखेर वाढला; पुण्यात काय चालू काय बदं?

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यातील 'लॉकडाउन'चा मुक्काम अखेर वाढला आणि आता तो ३१ मेपर्यंत पुणेकरांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनची अंमलबजावणी कशी असेल ? याची स्वतंत्र धोरण पुणे महापालिका रात्रीपर्यंत आखेल. मात्र, बाधित क्षेत्रात (कंटेन्मेट झोन) कठोर निबंध राहण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी बाधित क्षेत्राची हद्द कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. परंतु, या टप्प्यांत बाधित क्षेत्रातील रहिवाशांना नको त्या कारणांसाठी रस्त्यांवर उतरणार नाही, हे मात्र स्पष्ट आहे. त्यासाठी महापालिका आणि पोलिस खाते एकत्रित येऊन उपाय करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यांत जी दुकाने सुरू होती, त्यातील काही बंद होतील तर अन्य काही परिसरातील व्यवहार सुरळीत राहण्याची चिन्हे आहे. मात्र, तसे नवे धोरण रात्री जाहीर केले जाईल आणि लगेचच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संगितले.
-----------
पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण
-------
पुणे शहराच्या किमान तापमानात झाली वाढ; पुढील सहा दिवस...
------‌
‌या टप्प्यांतील लॉकडाउनमध्ये शहरातील शिवाजी रस्त्यापलीकडच्या सर्व पेठांमधील नागरिकांना अन्य भागांत ये-जा करण्यापासून रोखले जाणार आहे.
‌कोरोनाच्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या तिसऱ्या टप्प्यांतील १७ मे पर्यंतच्या लॉकडाउनची मुदत आज रात्री संपणार आहे. तेव्हा चौथ्या टप्प्यातील म्हणजे, पुढच्य पंधरा दिवसांसाठीचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. बाधित क्षेत्रात अधिक कठोर उपाय अमलात कोरोनाला लागाम घालण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची तयारी महापालिका आणि पुणे पोलिस करती आहे.
------------
काँग्रेसच्या मनरेगा रोपट्याला केंद्राकडून संजीवनी
-------
आता टाटास्काय आणि एअरटेल डिश टीव्हीवर भरणार शाळा; अर्थमंत्र्यांची घोषणा
-----------
मोठी बातमी : आत्मनिर्भर भारत-५  अर्थमंत्र्यांच्या 7 महत्त्वाच्या घोषणा
----------‌
‌शहरातील बाधित क्षेत्रातील कोरोनाला रोखण्यासाठी प्रचंड प्रयत्न करूनही 'इलाज' ‌होत नसल्याने या भागांत खबरदारीचे उपाय आखले आहेत. त्यातूनच जीवनाश्यक वस्तुंची दुकाने पूर्णपणे बंद ठेवताना बाधित क्षेत्रांचा एन्ट्री आणि आऊट पॉइंट रोखण्यात आले आहेत. तरीही रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रात क्षेत्रात किरणा दुकानदार, भाजीवाले आणि अन्य वस्तुंच्या विक्रेत्यांची दुकाने बंद केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रातील रहिवासी घरातून बाहेर येणार नाहीत आणि कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटली जाण्याची आशा संबंधित यंत्रणांना आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

‌महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, "लॉकडाउन वाढल्याने पुढे काय करायचे याबाबत राज्य सरकारच्या वाट पाहात आहोत. त्याबाबत सायंकाळी  चर्चा झाल्यानंतर पुढे काय आणि कशा पध्दतीने व्यवहार सुरू राहतील. याचे नियोजन करणार आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT