Lockdown likely to increase at Pune Pimpri Chinchwad 
पुणे

पुणे, पिंपरी चिंचवडवर लॉकडाउनचे सावट ?

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलीकरणात नागरिकांची गर्दी वाढत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढेल, अशी भीती प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहेत. तर, अधिकृत सूत्र या बाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे बोट दाखवित आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुण्यात कोरोनाचे रविवारी तब्बल 620 रुग्ण सापडले आहेत. तर शहरातील रुग्णांची संख्या 12 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर चिंता वाढली आहे. कडक उपाययोजना केल्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही, असाही सूर उमटत आहे. दुसरीकडे केंद्र सरकारच्या पथकाने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार असून त्यानुसार काळजी घेण्याचा आदेश पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला दिला आहे. मुंबईतही परिस्थिती गंभीर होत असल्याचे रुग्णांच्या वाढत असलेल्या आकडेवारीतून उघड झाले आहे. त्यातच दोन्ही शहरांतील बाजारपेठा नागरिकांनी गजबजलेल्या आहेत. त्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे डोळेझाक होत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. 

कोरोनाबाधितांना कारवाईची "लस'; सतरा दिवस घराबाहेर न पडण्याचे बंधन 

नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांत पुणे आणि पिंपरी चिंचवड येत्या दोन दिवसांत पुन्हा सील होणार आहे, तेथे पुन्हा लॉकडाउन होईल, अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले आहेत. पुण्यातही या मेसेजसचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांत भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करताना त्यात आणखी मजकूर  समाविष्ट केला जात असल्याचेही उघड झाले आहे. 

यंदा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम होणार कमी - दिनकर पाटील

पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे म्हणाले, ''लॉकडाउन वाढविण्याबाबत राज्य अथवा केंद्र सरकार निर्णय घेते. स्थानिक पातळीवर असा निर्णय होत नाही. राज्य सरकारने 1 जून रोजी दिलेल्या आदेशानुसारच सध्या काम सुरू आहे. कंटेनमेंट झोनची संख्या कमी करणे किंवा वाढविणे, हे स्थानिक प्रशासनाच्या हातात आहे. त्यामुळे काम सुरू आहे.''

चला वारीला : ना धावला अश्व उभा, रुसला लिंबाचा चांदोबा

महापालिका आयुक्त डॉ. शेखर गायकवाड यांनी, ''रुग्णांची संख्या वाढत असली तरी, केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशांनुसार सध्या काम सुरू आहे. या बाबत त्यांचे सुधारित आदेश येतील, त्यानुसार अंमलबजावणी करू. स्थानिक स्तरावर लॉकडाउनचा निर्णय अद्याप झालेला नाही. '' असे सांगितले.

चला वारीला : पुलावरून वाहे भक्तीचा झरा, माऊलींसाठी आतुरली नीरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT