Corona-MH 
पुणे

Big Breaking : राज्यात नव्या कोरोना रुग्णसंख्येने गाठला उच्चांक; दिवसभरात आढळले तब्बल...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी (ता.1) नवा उच्चांक गाठला असून, दिवसभरात एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. परिणामी, एकूण रुग्णांचा आकडा साडेअकरा हजार इतका झाला आहे. विविध शहरांमधील 26 रुग्ण मरण पावल्याने आतापर्यंत 485 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 106 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडलेल्या सर्व रुग्णांना पुढील 14 दिवस घराबाहेर न पडण्याची ताकीद देण्यात आली असून, अशा लोकांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

राज्यात आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक 887 रुग्णांची नोंद झाली. मात्र; गेल्या पाच दिवसांत ही संख्या पाचशे ते साडेपाचशेपर्यंत खाली आली होती. मात्र, रविवारी 1 हजार 8 रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

मृत व्यक्तींमध्ये पुण्यातील दहा, मुंबईतील पाच, जळगाव तीन, पुणे ग्रामीणमधील एकाचा समावेश आहे. त्यात 18 पुरुष आणि आठ महिला आहेत. सर्व मृत व्यक्ती 40 ते 60 आणि 60 पेक्षा अधिक वयाची आहेत. त्यांना उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हदयरोग, मूत्रपिंडाचे आजार असल्याचेही तपाण्यातून निष्पन्न झाले आहे.

आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 1 लाख 53 हजार 125 पैकी 1 लाख 40 हजार 587 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 11 हजार 506 जणांना कोरोना झाला आहे. त्यापैकी 1 हजार 879 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यभरात 

सध्या सुमारे 1 लाख 63 हजार लोकांना घरीच विलग राहण्याचा (होम क्वॉरंटाइन) सल्ला दिला आहे. तर 11 हजार 677 जण विविध रुग्णालयात दाखल आहेत. 

शुक्रवारचे नवे रुग्ण  1,008 
एकूण रुग्ण  11,506
दिवसभरातील मृत्यू  26 
एकूण मृत्यू  485
बरे झालेले एकूण रुग्ण  106 
बरे झालेले एकूण रुग्ण  1,879

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

SCROLL FOR NEXT