Manufacture of sanitizer tunnel and mask with chemical manufacturing process in pune.jpg 
पुणे

पॉझिटिव्ह बातमी : पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा होतेय 'आत्मनिर्भर'

सकाळवृत्तसेवा

पुणे : औषध निर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर असलेला आपला देश कच्च्यामालासाठी मात्र इतर देशांवर अवलंबून आहे. कोरोनामुळे जगभरातील लॉकडाउन आहे. त्यामुळे कच्च्यामालाचा पुरवठासुद्धा प्रभावित झाला आहे. भविष्यात कच्च्यामालासाठी इतर देशांवरील अवलंबित्व संपावे, यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये (एनसीएल) दहा रसायनांची निर्मिती प्रक्रिया विकसित करण्यात येत आहे. याद्वारे औषधनिर्मिती क्षेत्रात आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- काय होणार? 
महत्त्वाच्या आजारांमध्ये मूलभूत घटक म्हणून वापरल्या जाणाऱ्या रसायनांची निर्मिती प्रक्रिया एनसीएल विकसित करणार. यामध्ये "की स्टार्टिंग मटेरिअल' (केएसएम) आणि "एक्‍टीव फार्मासिटीकल इंनग्रीडीयन्स'ची (एपीआय) अशा विविध अभिक्रियाकारक रसायनांसह, जीवनसत्वे आणि इतर रसायनांचा समावेश आहे. 

पुण्यातल्या `त्या` भीती वाटणाऱ्या जागा अन् कीर्ररररर....शांतता!

 केव्हा होणार आणि कोण करणार? 
कोविड-19च्या भारतातील पहिल्या धडकेनंतरच संशोधकांनी ही हालचाल सुरू केली. देशाची सर्वोच्च संशोधन संस्था असलेली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेने (सीएसआयआर) यासाठी टास्क फोर्स नेमली. सर्वांत प्रथम 53 एक्‍टीव फार्मासिटीकल इंनग्रीडीयन्सची निश्‍चिती करण्यात आली. त्यातील 27 रसायने बहुतेक औषधांमध्ये मूलभूत रसायने म्हणून वापरण्यात येतात. त्यातील महत्त्वपूर्ण 10 ते 12 रसायनांची निर्मिती प्रक्रिया विकसित करण्याची तयारी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने केली आहे. पुढील काही महिन्यात विकसित करण्यात आलेले हे तंत्रज्ञान उद्योगांना हस्तांतरित करण्यात येईल, असे एनसीएलचे महासंचालक डॉ. अश्‍विनि कुमार नांगिया यांनी सांगितले. 

अरे बापरे ! मार्केट यार्डात पुणेकरांची झुंबड; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा       

 का निर्माण झाली गरज? 
स्वामित्व हक्कांमुळे औषधांसाठी लागणाऱ्या रसायनांची निर्मिती विशिष्ट कंपन्याच करु शकतात. त्यामुळे इतर देशांना निर्मिती करणे शक्‍य होत नाही. एनसीएल औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही मूलभूत रसायनांची निर्मिती करण्यासाठी स्वतंत्र, किफायतशीर आणि स्वदेशी पद्धत संशोधनातून विकसित करणार. यामुळे कोरोनासारख्या आणीबाणीच्या परिस्थितीतही आपण औषधांच्या बाबतीत स्वयंपुर्ण असू आणि स्वदेशी उद्योगांना यातून उत्तेजन मिळेल. 

बारामती तालुक्‍यात कोरोनाची मुंबई मार्गे पुन्हा एन्ट्री...  

विकसित होणार खालील रसायनांची निर्मिती प्रक्रिया  
रसायनांचे नाव औषधाचा प्रकार उपयोग वार्षिक आयात 
1) 1,1-सायक्‍लोहेक्‍झीन-डायऍसेटीक ऍसिड न्युरोपॅथिक मज्जासंस्थेशी निगडित आजार 15 हजार टन 
2) डायसायनॅमाईड मेटफॉर्मिंग मधुमेहाशी निगडित औषधे 21 हजार टन 
3) पेरा अमिनो फिनॉल (पीएपी) वेदनाशामक पॅरासिटमॉल 30 हजार टन 
4) सॅलिसिलीक ऍसिड आम्ल ऍस्पिरीन 25 हजार टन (गरज) 
5) फ्लुरोनायटेड आणि क्‍लोरोनायटेड बॅंझॉईक ऍसिड अँटिबायोटिक्‍स, सिप्रोफ्लॉक्‍सेसीन जीवानूजन्य आजार, त्वचा, मृत्रसंस्था, श्‍वसनमार्ग आणि हाडांचे विकार 
6) 2-मिथील-5-नायट्रोमीडेझॉल (एमएनआय) अँटिबायोटिक, टिनिडाझोल, मेट्रीनिडाझोल आदी टॅब्लेट्‌स पोटाचे विकार, मळमळ, आदी
7) गुनाईन अँटिव्हायरल हेट्रोसायक्‍लिक स्केलेटन इन ड्रग्ज मॉलिक्‍यूल
8) हायड्रॉक्‍झील क्‍लोरोक्वीन, रिटोनावीर-लॉपीनावीर आदी अँटीवायलर औषधे कोरोनासारखे संसर्गजन्य आजार
9) पेनिसिलीन-जी, 6-अमिनो-पेनिसिलॅनिक ऍसिड आदी मूलभूत रसायने -15 हजार टन 


पुण्याच्या सदाशिव पेठेतील 'ते' ३३ रूग्ण बरे; संपर्कात आलेल्यांना शोधणे ठरतेय अवघड

संशोधनाची वैशिष्ट्ये  
- कंटिन्यूअस फ्लो सिंथेसिसचा प्रक्रियेचा होणार वापर 
- यामुळे कमीत कमी उर्जा, वेळ आणि संसाधनांत जास्त उत्पादन 
- नासाडी किंवा वाया जाणारे रसायनांचे प्रमाण कमी 
- एनसीएलने या आधीही अशा प्रक्रिया विकसित केल्या आहेत 
- नायट्रेशन, हॅलोजनेशन, ओझोनोलायसीस, ऑक्‍सिडेशन आदी अभिक्रीया पद्धती विकसित करणार 


थरारक! पुण्यात एका घरावर अंदाधुंद गोळीबार; एक गंभीर जखमी

संशोधनाचे परिणाम  
- स्वदेशी निर्मिती प्रक्रिया विकसित होणार 
- रसायनांच्या आयातीबरोबरच विदेशी गंगाजळी वाचणार 
- औषधांच्या बाबतीत स्वयंपुर्णता 
- रासायनिक क्षेत्रातील उद्योगांना नव्या संधी 


शरिरातील पेशींच्या हालचालींवर ठेवता येणार लक्ष; पुण्यात झालं संशोधन

"निश्‍चित केलेल्या रसायनांपैकी 3 ते 4 रसायनांची निर्मिती प्रक्रीयेवरील संशोधन अंतिम टप्प्यात आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ही प्रक्रिया पुर्ण होईल. संशोधन पुर्ण झाल्यानंतर उत्पादनासाठी तातडीने ते उद्योगांकडे सुपुर्त करण्यात येईल.'" 
- डॉ. अश्‍विनीा कुमार नांगिया, संचालक, एनसीएल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT