The masses will also get Milk during Curfew
The masses will also get Milk during Curfew 
पुणे

जनता कर्फ्यूतही दूध मिळणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर चहाचे हॉटेल्स, बेकरीवाले, चहा टपऱ्या बंद झाल्याने दररोजच्या दुधाच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहराला दूध पुरवठा करणाऱ्या सहकारी व खासगी दूध संस्थांनी नेहमीच्या तुलनेत दूध पुरवठ्यात घट केली आहे. तरीसुद्धा दूध हे जीवनावश्‍यक वस्तूत येत असल्याने नागरिकांसाठी नेहमीप्रमाणे दुधाचा पुरवठा करण्याचा निर्णय या दूध संघांनी घेतला आहे. त्यामुळे त्यामुळे पुणेकरांना येत्या रविवारी (ता.22) जनता कर्फ्युच्या
काळातही दूध मिळणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चितळे दूध हे रविवारी सकाळी जनता कर्फ्यू चालू होण्यापूर्वी आणि संध्याकाळी कर्फ्यू कालावधी संपल्यानंतर उपलब्ध असणार आहे. हा प्रश्‍न केवळ रविवारपुरता मर्यादित असेल. सोमवारपासून नेहमीप्रमाणे पुरवठा सुरळीत असणार आहे. त्यामुळे त्यामुळे नागरिकांनी येत्या रविवारी आपापल्या सोयीनुसार जवळच्या विक्रेत्यांकडून दूध नेण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन चितळे दूध संस्थेचे संचालक गिरीश चितळे यांनी केले आहे.

- कोरोनासोबतच्या लढतीत मदत करतंय गुगलचं 'हे' भन्नाट फिचर..

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) 24 तास दूध पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कात्रज डेअरीच्या मुख्यालयातील आऊटलेट आणि याच परिसरातील सरहद शाळेसमोरील दूध पार्लरमधून 24 तास दुधाची विक्री केली जाणार आहे. याशिवाय कात्रज डेअरीचे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मिळून सुमारे 600 किरकोळ विक्रेते आणि 100 दूध पार्लर आहेत. किरकोळ विक्रेत्यांपैकी काहींनी मागणी नोंदवलेली नाही. मात्र डेअरीच्या सर्व पार्लरमध्ये 24 तास दूध मिळेल, अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले.

- गुड न्यूज : सलग तिसऱ्या दिवशी चीनने मारली बाजी; वाचा सविस्तर बातमी

दरम्यान, जनता कर्फ्यू असली तरी, दूध हे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि रुग्ण आदींसाठी हवे असते. शिवाय दूध पुरवठा हा अत्यावश्‍यक आणि जीवनावश्‍यक सेवेत मोडतो. त्यामुळे मागणीत घट झाली असली तरी सोनाई दुधाचा मागणीनुसार पुरवठा केला जाणार असल्याचे या दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ माने यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT