Crime_Arrest 
पुणे

एजंट हल्ला प्रकरण : मुख्य सूत्रधाराला न्यायालयीन कोठडी; 4 आरोपी अजूनही फरार

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव (पुणे) : येथील जमीन खरेदी विक्री एजंट संग्राम जगन्नाथ घोडेकर यांच्यावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला करण्यात आला होता. या टोळीचा सूत्रधार माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे( वय ६१, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) याला जुन्नर न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी शनिवारी (ता.९) येरवडा कारागृहात करण्यात आली, अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी.के.गुंड यांनी दिली.

गुंड म्हणाले, कोऱ्हाळे आणि घोडेकर यांच्यात जमीन विक्रीच्या व्यवहारातील आर्थिक देवाणघेवाण आणि कोल्हेमळा येथील रो-हाऊसचा ताबा यावरून वाद होता. या वादातून घोडेकर याच्यावर हल्ला करण्याचा कट कोऱ्हाळे याने रचला होता. या कामात प्रशांत माने (वय ३८) याने कोऱ्हाळे याला मदत केली होती. कोऱ्हाळे याच्याकडून सुपारी घेऊन गुरुवारी दुपारी घोडेकर यांच्यावर साईल शेख (वय १८), सोन्या राठोड (वय २४), भावेश राजेंद्र लेंडे (वय २०) यांनी कोयत्याने डोक्यावर हल्ला केला होता.

या हल्ल्यात घोडेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी सकाळी कोऱ्हाळे याला अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती गुंड यांनी दिली.

चार आरोपी फरार :

या गुन्ह्यातील आरोपी  शेख, राठोड, लेंडे आणि माने फरार असून अद्याप त्यांचा शोध लागला नाही. सद्यस्थितीत या गुन्ह्यात कोऱ्हाळे सह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT