जुन्नर : हरिश्चंद्रगडावरील वाट चुकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात जुन्नर वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला तीन तासानंतर यश आले. बुट्टेवाडी-चास (ता. खेड जि. पुणे) येथील पाच तरुण शनिवारी (ता. ११) रोजी मध्यरात्रीनंतर हरिश्चंद्रगडावर पोचले. मावळचे आमदार सुनील शेळके यांचे स्वीय सहायक सचिन वामन यांना ही बातमी समजताच जुन्नर वनविभागाचे वनरक्षक माजी सैनिक रमेश खरमाळे यांच्याशी संपर्क साधून सुटका करण्याची विनंती केली. आणि काही तासांतच त्यांची सुटका झाली.
रविवारी (ता. १२) रोजी दर्शन घेऊन परत येत असताना अतिशय दाट धुक्यामध्ये वाट चुकले. तारामती शिखराच्या कारवी जंगलात काहीच दिसत नसल्यामुळे सोमवारी दिवसभर ते भरकटत राहिले. दाट धुक्यातून कसेबसे बालेकिल्ल्याच्या दिशेने ते निघाले.
यावेळी प्रतिक ज्ञानेश्वर तळेकर (वय २१) याने आपल्या सहकाऱ्यांना तुम्ही पुढे चला, मी येतोच तुमच्या मागून असे म्हणाला यामुळे त्याचे सहकारी जुन्नर दरवाजाने गड उतरून खाली आले. प्रतीक मात्र पायवाटा बुजल्याने भरकटत भरकटत बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहचला. तो भुकेने व्याकूळ झाला होता. सहकारी पुढे गेले होते. संपर्काचे साधन काहीच नव्हते. अशा वेळी तेथे आलेला एक कुत्रा हीच त्यांची सोबत होती. देव रूपाने तो तेथे आला असल्याची त्याची भावना झाली. त्याने जिद्द सोडली नाही. प्रतीक बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी सोमवारी पोहचला, तेव्हा त्याला मोबाईल नेटवर्क मिळाल्याने त्याने वडिलांशी संपर्क केला व वाट चुकल्यामुळे मी गडावरच अडकलो असल्याचे त्याने सांगितले. इतक्यात त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला.
मावळचे आमदार सुनील शेळके यांचे स्वीय सहायक सचिन वामन यांना ही बातमी समजताच जुन्नर वनविभागाचे वनरक्षक माजी सैनिक रमेश खरमाळे यांच्याशी संपर्क साधून सुटका करण्याची विनंती केली. रमेश खरमाळे व त्यांचे सहकारी जुन्नरहून सोमवारी रात्री १० वा. हरिश्चंद्रगड मोहीमेसाठी खिरेश्वरला पोहचले. येथील स्थानिक युवकांना बरोबर घेऊन जुन्नर दरवाजा, टोलार खिंड व बेलपाडा नळी या तीन मार्गाने शोधमोहीमेस सुरू केली.
या तीनही मार्गाने एकमेकांच्या संपर्कात राहून शोध मोहीम सुरू असताना रात्री १ च्या दरम्यान हरीचंद्रगडावरील बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी नितीन मेमाणेच्या टिमला प्रतिक दृष्टीस पडला. तोपर्यंत खरमाळे आणि कमळू पोकळा यांच्या टिम तेथे पोहचल्या. खरमाळे यांनी प्रतिकला बिस्कीट व पाणी देऊन प्रथमोलचार दिले व टोलार खिंड मार्गे रात्री ३ वाजता खाली आणून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
या शोध मोहिमेत जुन्नर वनविभागाचे वनपाल शशिकांत मडके, वनरक्षक रमेश खरमाळे, त्रिंबक जगताप, स्वरुप रेंगडे खिरेश्वर येथील युवक बाळू चहादु रेंगडे, नितीन भिमा मेमाणे,
चिंतामण बुधा कवटे, काशिनाथ पांडुरंग बहुर्ले, बेलपाडा येथील कमळु पोकळा, कमा पोकळा यांनी सहभाग घेतला.
"कोविड मुळे सद्या हरिश्चंद्रगडावर पर्यटक येत नाहीत. पावसामुळे पाऊल वाटावरील गवत वाढले आहे ये-जा होत नसल्यामुळे या वाटा बुजल्या आहेत. दाट धुके असल्यावर पुढे काही दिसत नाही. कारवीचे जंगल वाढले आहे यामुळे अननुभवी पर्यटकांनी येथे येण्याचे धाडस न केलेले चांगले यायचे झाल्यास अनुभवी माहितगार बरोबर असणे आवश्यक आहे.-रमेश खरमाळे, माजी सैनिक
(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.