Ravindra Dhangekar 
पुणे

Ravindra Dhangekar: "चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा, पुणेकर त्यांना..." ; रविंद्र धंगेकरांचा खोचक टोला!

Sandip Kapde

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. मात्र प्रचारादरम्यान भाजप नेते चंद्रकातं पाटील विरूद्ध धंगरेकर असा वाद रंगला होता.

Who इज धंगेकर म्हणत चंद्रकांत पाटील यांनी धंगेकरांना डिवचल होत. दरम्यान धंगेकर यांनी पाटलांना चांगलाच टोला लगावला आहे.

रविंद्र धंगेकर म्हणाले, "चंद्रकांत पाटील आलेला पाहुणा? किती दिवस ठेवायचा हे पुणेकर पाहतील. येत्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील कोल्हापूरला जातील की थांबतील हे लवकर कळेल. त्यांच्या बोलण्याचा रुबाब खाली ढासळेल. पुणेकरांच्या विषयात त्यांनी ढवळाढवळ करु नये"

चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य हुकुमशाहीच्या वाटेला साजेसे आहे. सामान्य जनता हे बघत असते. त्यांच्याकडे आता बघायचे नाही, असे धंगेकर म्हणाले.

'हू इज धंगेकर' असं चंद्रकांत पाटील माध्यमा समोर म्हणाले होते. पण आता याच निवडणुकीचं संपूर्ण समाचार घेणारे आणि धंगेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारे एक धमाल गाणे काही ग्रामीण कलाकारांनी तयार केले आहे.

कसब्यात भाजपचा विजय करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील २०-२५ मंत्री महाराष्ट्रातील ६५ आमदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे महापालिकेतील ९० पेक्षा जास्त नगरसेवक या प्रचारत सामील झाले होते. तरी देखील रविंद्र धंगेकर यांचा पराभव भाजप करू शकला नाही. २५ वर्षाच्या भाजपच्या या गडाला काँग्रेसने सुरूंग लावला.

भाजपसह शिंदेंची शिवसेना मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरली होती तरी देखील मविआने चारीमुंड्या चित करत विजय खेचून आणला आहे. ११०४० मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी ६१७७१ मत पडली तर विजयी रविंद्र धंगेकर यांना ६२५९९ इतकी मत पडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT