market 1.jpg
market 1.jpg 
पुणे

पुणेकरांना आता भाज्या, किराणा मिळणार मुबलक; कारण...

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : गुलटेकडी मार्केट यार्डात कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी बाजार समितीकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तब्बल ५० दिवसानंतर रविवारी (ता.३१) पासून तरकारी, फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पान विभाग सुरू होणार आहेत. एक अडता एक वाहन या प्रमाणे बाजार साधारणतः ४०० वाहने येणार असल्याचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

बाजारात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण बाजाराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. बाजारात भाजीपाला आल्यानंतर विविध टेम्पोद्वारे संपूर्ण शहरात पाठविला जाणार आहे.

अडते, कामगार यांना ओळखपत्र तपासून गेट क्र. १ व गेट क्र. ४ ने प्रवेश देण्यात येणार आहे. बाजार आवारातील गाळ्याच्या बर्हिगोल पाकळीच्या बाहेरच्या बाजूचे गाळेधारक अडते रविवार (ता. ३१) तर आतील बाजूचे अडते सोमवार (ता. १) पासून पुढील प्रत्येक दिवशी दिवसाआड पद्धतीने व्यापार सुरू करण्यात येणार आहे.
दोघी बहिणींची भटकंती निसर्गसेवेसाठी

बाजार सुरू झाल्यानंतर वाहनांची तसेच खरेदीदारांची गर्दी टाळण्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती.
 

असे आहे नियोजन.....
- ग्राहकांचे तापमान तपासणीसाठी थर्मल गणचा वापर
- प्रत्येकाला सॅनिटायझर दिले जाणार
- पोस्ट ऑफिस चौक आणि उत्सव बिल्डिंग येथे बॅरिगेट्स 
- या चौकातून तपासणी करूनच आत सोडले जाणार
- गर्दीच्या शक्यतेने बटाटा शेड बंद
- बाजार समितीचे ७० कर्मचारी आणि साधारणतः २५ ते ३० पोलिसांच्या संरक्षणात बाजार चालू राहणार
- संपूर्ण बाजाराचे निर्जंतूकीकरण आणि स्वच्छता
-  बाधित परिसरातील लोकांना बाजारात प्रतिबंध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT