सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवड शहर पुण्याजवळ असल्याने व येथून पुण्यात नित्यपणे जा - ये करणारे 'होम क्वारंटाइन' राहत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातून अल्पावधीत पुरंदर तालुक्याने कोरोनाबाधितांचे त्रिशतक झाले, तर सासवड द्विशतकाच्या उंबरठय़ावर पोचले आहे. विस्कळीत व अपुरी व्यवस्था, वैद्यकीय यंत्रणा कमी, लोकांच्या मनात वाढणारी भिती.. यातून परिस्थिती अवघड होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
सासवड शहरात कोरोना संसर्गाची गती थांबत नाही. आज शहरात तब्बल 16 रुग्ण वाढून शहरात कोरोनाबाधितांची संख्या 191 वर पोचली आहे. शहर डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर पोचले आहे. लाॅकडाउन थोडा शिथील आहे आणि पूर्ण उठवला तर गुणाकाराचा वेग किती असेल, याची चिंता आहे. पुरंदर तालुक्यात आज कोरोनाचे 26 रुग्ण निष्पन्न होऊन तालुका त्रिशतक पार करून 323 वर पोचला. आज सासवड 16 रुग्णांसह सोनोरी सहा, जेजुरी दोन, भिवडी दोन, सिंगापूर व पारगाव प्रत्येकी एक, असे रुग्ण आढळून आले. अल्पावधीतच 12 बाधीतांचे मृत्यू मात्र हादरवून टाकणारे व चटका लावून जाणारे ठरले आहेत.
पुरंदर तालुक्याचे मुख्यालय सासवड शहर आहे. येथे निम्मे सासवडकर व तालुक्याच्या ग्रामीणमधील लोक निम्मे, असे रहिवासी आहेत. नोकरी, धंद्यानिमित्त जा- ये करणारे व फिरून काम करणारे येथे अधिक आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास सूक्ष्म उपाययोजना राबविणे गरजेचे आहे, हे स्पष्ट होत आहे.
Edited By : Nilesh J Shende
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.