corona1 
पुणे

जेजुरीकरांची कोरोनाला टक्कर...निम्म्यापेक्षा जास्त रुग्णांची मात  

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : जेजुरी शहरात आतापर्यंत एकूण ४५ जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २६ रुग्णांवर उपचार करून घरी सोडले आहे. सध्या १६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जेजुरी शहरात कोरोनावर उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे जेजुरीकरांना दिलासा मिळत आहे. जेजुरीतील सुमारे २६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनाचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वात जास्त धोका असल्याचे दिसून येत आहे. तीन ज्येष्ठ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना काही प्रमाणात इतर आजारही होते. जेजुरीतील कोरोना केअर सेंटरमध्ये सध्या सोळा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

जेजुरी नगरपालिकेच्यावतीने शहरात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शहरातील सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत सुरु आहेत. मात्र, नागरिकांना व व्यावसायिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत खंडोबा मंदिरही बंदच राहणार आहे. शहरातील भाजीमंडई सबंधित विक्रेत्यांना शहरात वेगवेगळया भागात जागा नेमून देण्यात आल्या आहेत. इतर व्यावसायिकांनाही योग्य ती काळजी घेण्याचे सुचविले आहे. शहरात औषध फवारणी केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली आहे.

जेजुरी परिसरातील काही गावात कोरोनाचा शिरकाव वाढू लागला आहे. त्यामध्ये कोळविहिरे, नावळी, कोथळे येथे काही रुग्ण सापडल्याने त्याही ठिकाणी प्रशासनाच्यावतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, जेजुरी पालिका प्रशासन व पोलिस यांचा योग्य समन्वय असल्याने जेजुरी शहरात रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT