Pune-Municipal 
पुणे

मिळकतकर वाढीसाठी महापालिकेची शक्कल

ज्ञानेश सावंत

पुणे - बेकायदेशीरपणे बांधलेल्या आणि नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांची मिळकतकर विभागाकडे नोंदणीची मोहीम महापालिकेने अखेर हाती घेतली आहे. यातून सुमारे दोन-सव्वादोन लाख मिळकतींची नोंद होऊन १०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. अशा मिळकतींची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहर आणि उपनगरांत गेल्या काही वर्षांत बेकायदा बांधकामे झाली आहेत. परिणामी, त्यांच्या महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाकडे नोंदी झालेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा बांधकामांचा शोध घेऊन करआकारणीसाठी प्रयत्न झालेले नाहीत. त्यातच कोरोनामुळे उत्पन्नात घट होऊन महापालिकेच्या तिजोरीत १०० कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उत्पन्नवाढीचे नवे स्रोत शोधण्याचा भाग म्हणून वर्षानुवर्षे कर लागू नसलेल्या मिळकतींची नोंद करण्याच्या सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केल्या होता. त्यानुसार ही मोहीम सुरू केली आहे.

महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते आबा बागूल म्हणाले, ‘‘प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच मिळकतींची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे वर्षाला शेकडो कोटी रुपयांचा कर बुडत आहे. सर्व मिळकतींची पाहणी करावी.’’

मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे म्हणाले, ‘‘ज्या निवासी आणि व्यावसायिक मिळकतींना कर लागू नाही, अशा मिळकतींची नोंद करून कर आकारला जाईल. विविध भागांतील मिळकतींची प्रत्यक्ष पाहणी करून प्रचलित दराप्रमाणे कर वसूल केला जाणार आहे.’’

दोन लाख मिळकतींची नोंद होणार शक्‍य
पुणे शहर आणि नव्या ११ गावांतील सुमारे १० लाख ६१ हजार निवासी, व्यावसायिक मिळकतींची महापालिकेकडे नोंद आहे. नव्या मोहिमेतून अंदाजे चार लाख मिळकती आढळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात दोन लाख मिळकतींची नोंद शक्‍य असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Labour Code: पगाराचं गणित बदलणार! हातात येणारा पगार कमी होणार? PF वर काय परिणाम? समजून घ्या पूर्ण गणित

Tech Layoffs 2026: AI च्या वाढत्या प्रभावामुळे टेक क्षेत्रात पुन्हा नोकरकपातीची लाट; मेटा नंतर आता मायक्रोसॉफ्टमधील नोकऱ्या धोक्यात

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून 'ही' अभिनेत्री घेणार ब्रेक? पायाला झाली गंभीर दुखापत, डॉक्टरांनी दिला सर्जरीचा सल्ला

१५ मिनिटांचा निष्काळजीपणा अन् ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा नाहक जीव गेला; नेमकं काय घडलं? घटना वाचून मन हेलावेल

Sanjay Gaikwad Row: "आमदारकी रद्द करण्यासंदर्भात..." ; संजय गायकवाडांवर खासदार शाहू महाराज छत्रपती यांचा संताप!

SCROLL FOR NEXT