Pune-Municipal 
पुणे

बाधितांच्या तक्रारी असतानाही खासगी रुग्णालयांना महापालिकेने दिले ४२ कोटी

ज्ञानेश सावंत

पुणे - शहरी-गरीब योजनेच्या लाभार्थ्यांना उपचार मिळेनात, उपचाराचे बिल लाखांत आलेय, योजनेचे पत्र देऊनही बिल कमी झाले नाही, बिल भरेपर्यंत रुग्णाला सोडले नाही, अशा असंख्य तक्रारी कोरोनाच्या काळात आल्या. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या साडेसात हजार रुग्णांचे तब्बल ४२ कोटी रुपयांचे बिल महापालिकेने भरले आहे. म्हणजे, प्रत्येक रुग्णावर ५७ हजार रुपये खर्च झाल्याचे महापालिकेने दाखविले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या शहरी-गरीब योजनेतून गरीब कुटुंबातील रुग्णांच्या उपचारावर ही रक्कम खर्च झाल्याची नोंद आहे. त्यात साडेसहा हजार रुग्ण कोरोनाचे तर मूत्रपिंड आणि कर्करोगाच्या ८५० रुग्णांचा समावेश आहे. गरीब कुटुंबाच्या आरोग्याचा खर्च गेल्या सात महिन्यांतील आहे. पुण्यात कोरोनाची साथ वाढल्यानंतर या आजाराच्या रुग्णांनी विशेषत: गरीब कुटुंबातील लोकांनी शहरी-गरीब योजनेचा आधार घेतला. परिणामी फेब्रुवारी, मार्चपासूनच योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढली. योजनेच्या निकषानुसार महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून संबंधितांना उपचारासाठीचे पत्र दिले. त्यानंतरही कोरोना रुग्णांना उपचार देण्यास खासगी रूग्णालयांकडून टाळाटाळ झाली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल झाले. 

काही रुग्णांची प्रकृती रुग्णालयाच्या दारातच खालावल्याची उदाहरणे पुढे आली. तर मोजक्‍याच रुग्णालयांनी उपचार दिले. तिथेही योजनेच्या मूळ उद्देशानुसार निम्मे बिल कमी झाले नसल्याच्या तक्रारी आल्या. तरीही खासगी रुग्णालयांत उपचार घेतलेल्या गरीब रुग्णांसाठी एवढा खर्च केल्याचे आकडे पुढे आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. योजनेची व्याप्ती वाढविताना तिच्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्याची अपेक्षा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम यांची आहे.  

शहरी-गरीब योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना पत्र दिले जाते. सध्या ती संख्या वाढली आहे. त्याचवेळी मूत्रपिंड आणि कर्करोगाच्या रुग्णांना दोन लाख रुपयांची सवलती दिली जाते. त्यामुळे योजनेचा विस्तार वाढत आहे. मात्र, या वर्षातील रकमेतून गेल्या वर्षीचीही बिले दिली आहेत.
- डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

अशी आहे योजना
पुणे महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असलेल्या कुटुंबांना शहरी-गरीब योजनेचा लाभ दिला जातो. त्यातून एका कुटुंबासाठी वर्षाला एक लाखाचा लाभ मिळतो. या योजनेंतर्गत उपचारासाठी महापालिकेच्या वतीने पत्र दिले जाते. त्यानंतर एकूण उपचार खर्चापैकी निम्मे बिल महापालिका देते. या योजनेसाठी ७४ रुग्णालयांसोबत महापालिकेचा करार झाला आहे. उपचार खर्चाचे पैसे रुग्णालयाच्या बॅंक खात्यात जमा होतात.

शहरी गरीब योजना

  • ४२ कोटी योजनेसाठी तरतूद (रुपये)
  • ४१ कोटी ९६ लाख एप्रिल २०२० ते मार्च २०२१ (खर्च)
  • ७ हजार ५५६ एप्रिल २०२० ते २ नोव्हें. २०२० (पात्र रुग्ण)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: LPG सिलेंडर महागला, मग पेट्रोल-डिझेलचे काय? महिन्याच्या सुरुवातीलाच नवे दर जाहीर; महाराष्ट्रात कितीला मिळतंय?

Kunbi Caste Certificate Invalidity Case: कुणबीत जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्यांना आणखी एक धक्का! आता थेट हायकोर्टातच अंतिम सुनावणी होईल

करोडोंची संपत्ती, पण प्रवास रिक्षातून! रजनीकांत यांच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मनं; Video चर्चेत

Toll Hike: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर आजपासून टोल 'भार', पाचही नाक्यांवर २० टक्के दरवाढ; आता किती द्यावा लागणार टोल?

Latest Marathi News Live Update : अमरावती-बडनेरा शहराचा आज पाणीपुरवठा बंद

SCROLL FOR NEXT